भूमिका अभिनय व नृत्य स्पर्धा संपन्न, नांदगांव शाळेने पटकाविला पहिलि नंबर

80

मूल : विद्यार्थ्यांमधील असलेले कला गुणांना वाव मिळावा आणि अमली पदार्थ, आरोग्य, व्यसनाधीनता याबद्द्ल समाज जागृती व्हावी हा दृष्टिकोन पुढे ठेऊन शिक्षण उपसंचालक यांच्या आदेशाने शिक्षणाधिकारी प्राथमिक जी. प .चंद्रपूर यांच्या वतीने राष्ट्रीय लोकसंख्या प्रकल्प अंतर्गत भूमिका अभिनय आणि नृत्य स्पर्धेचे आयोजन पंचायत समिती मूल येथे करण्यात आले. सदर कार्यक्रम मूल येथील गट शिक्षणाधिकारी सौ.वर्षा पिपरे भाग शिक्षणाधिकारी कू.जयश्री गुज्जनवार, केंद्र प्रमुख डब्लू. एस. आत्राम, प्रमोद कोरडे, दयाराम भाकरे, यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला. आयोजित स्पर्धेत सात शाळांनी भाग घेतला. नृत्य ,अभिनयात एकापेक्षा एक सरस स्पर्धकांनी आपली कला सादर केली. स्पर्धेचे परीक्षण अशोक येरमे, विद्या कोसे, आणि माया झरकर यांनी केले. या स्पर्धेत भूमिका अभिनय आणि लोक नृत्यात जी. प. हायस्कूल नांदगाव यांचा प्रथम क्रमांक, नृत्यात द्वितीय खालवसपेठ, तृतीय जी. प. शाळा चीतेगाव यांनी मिळविला. कार्यक्रमाचे आयोजन गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती मूलच्या वतीने आनंद गोंगले, सचिन पुल्लावार, रापर्तीवार म्याड. कल्पना दुधानी यांनी केले .कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षिका व प्रेक्षक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here