गडीसुर्ला येथील जिल्हा परिषद शाळेत होतो संवाद मनामनाचा, अनोख्या उपक्रमाचे सर्वञ स्वागत

72

मूल : मागील काही वर्षापासुन शासनाकडून दप्तराविना शाळा या उपक्रमाचे आयोजन केल्या जात आहे. शासनाच्या या उपक्रमांतर्गत पंचायत समिती मूल अधीनस्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडीसुर्ला येथे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांना वकृत्वशैली अवगत होवुन त्यांचेत वकृत्वाचे धाडस निर्माण व्हावे व व्यक्तीमत्व विकासाची दिशा मिळुन तो आदर्श नागरीक घडावा या उद्देशाने दर शनिवारला विद्यार्थी कट्टा आयोजित संवाद मनामनाचा हा आगळा वेगळा कार्यक्रम राबवित आहे .या कार्यक्रमा मधुन शाळेची इयत्ता सातवीची विद्यार्थीनी श्रावणी मोहुर्ले प्रत्येक महिन्याला विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या मान्यवरांची मुलाखतीद्वारे संवाद साधत आहे . आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सुरूवातीला ऑटोग्राफ घेतला जातो. नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमात झाडीपट्टीचे साहीत्य मंडळाचे पदाधिकारी तथा नवोदीत कवी लक्ष्मण खोबरागडे आणि सौ. वृंदा पगडपल्लीवार या दोघांची मुलाखत श्रावणीने आपल्या सुंदर अशा शैलीमध्ये हसत खेळत घेतली. त्यामुळे तीच्यातील या गुणांचे व शाळेचे सर्व स्तरातून कौतुक केल्या जात आहे.शाळेचे मुख्याध्यापक सुरेश टिकले यांचे मार्गदर्शनात शिक्षक अविनाश श्रीगुरूवार, नवनित कंदलवार, चौधरी, विजय दुधे, शितल धकाते, स्मिता सायरे यांचेसह शाळेतील मंत्रिमंडळ व विद्यार्थी नव्या उपक्रमाच्या यशास्वीतेसाठी परीश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here