सेंट अँन्स हायस्कुलची गौरी तरोणे तालुक्यात प्रथम, स्वामी विवेकानंद विद्या मंदीरची सृष्टी भुरसे दुसरी, तालुक्यात प्रथम तीन क्रमाकांच्या मानकरी ठरल्या मूली

85

मूल : नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता 10 वी च्या निकालात तालुक्यात प्रथम, द्वितीय आणि तृतीय येण्याचा बहुमान मूलींनी मिळविला असून स्थानिक सेंट अँन्स हायस्कुल, माऊंट काॅन्व्हेन्ट आणि बल्लारपूर पब्लीक स्कुल या तीन शाळांनी 100 टक्के निकाल दिला आहे. स्थानिक सेंट अँन्स हायस्कुल मूलची विद्यार्थीनी गौरी चोपराम तरोणे हीने 97 टक्के गुण मिळवुन तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. स्वामी विवेकानंद विद्या मंदिर मूलची विद्यार्थीनी सृष्टी बंडु भुरसे हीने 95.40 टक्के गुण मिळवून दुसरी तर याच विद्यालयाची धनश्री मिलींद हेडाऊ हीने 94.40 टक्के मिळवून तालुक्यात तिसरी येण्याचा मान मिळविला आहे. सेंट अँन्स हायस्कुलची संस्कृती प्रदिप वेलपुलवार हीला चवथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. तालुक्यात इयत्ता दहावीच्या एकुण 25 शाळा असून सर्वंच शाळांचा निकाल उत्तम लागल्याने शिक्षण संस्थाचालकांशिवाय मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. नवभारत कन्या विद्यालय मूलची प्राची प्रकाश पंधरे (93) सेंट अँन्स हायस्कुलचा हर्ष चंदु शेंन्डे (92.80) सर्वेश संजय कामडे (92.40) नव भारत कन्या विद्यालयाची सलोनी अमोल गुलभमवार (92.40) नवभारत विद्यालय मूलचा सक्षम अशोक गगपल्लीवार (92.20) पियुष दिलीप वाढोणकर (92) रोहीत यशवंत लांजे (91.80) अनमोल राजहंस जांभुळकर (91.60) प्रथमेश विनोद दांडेकर (91.60) रिया नरेंद्र ढोलणे (91.40) आश्लेषा चंद्रकांत आष्टणकर (91.20) अंकीत विनोद कावळे (90.80) यांचेसह 15 चे वर विद्यार्थ्यांनी 90 टक्के गुण मिळवून तालुक्यात नाव लौकीक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here