भविष्यात नोकऱ्या मिळणे कठीण असल्याने गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा – आ. सुधाकर अडबाले, उत्कृष्ट शेतकरी आणि गुणवंताचा सन्मान सोहळा संपन्न

53

सावली : विद्यमान शासनाच्या उदासिन धोरणामूळे राज्यातील शिक्षणाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत असून पद भरतीसाठी खोक्यांचा व्यवहार सुरू झाला आहे. भविष्यात आरक्षणामूळे नोक-या मिळणे कठीण जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे. असे आवाहन आ. सुधाकर अडबाले यांनी केले.

स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावलीच्या वतीने आयोजीत आजी व माजी गुणवंत विद्यार्थी आणि तालुक्यातील उत्कृष्ट शेतकरी यांच्या सत्कार समारंभात विधान परिषद सदस्य आ. सुधाकर अडबाले बोलत होते. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, माजी आमदार देवराव भांडेकर, माजी आमदार डाॅ. नामदेव उसेंडी, संस्थाध्यक्ष संदीप गड्डमवार, सचिव राजाबाळ संगीडवार आदि उपस्थित होते. महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डाॅ. अशोक खोबरागडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी आमदार देवराव भांडेकर, डाॅ. नामदेव उसेंडी आणि संतोषसिंह रावत यांनी मनोगत व्यक्त करतांना गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मान्यवरांचे हस्ते महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमातील पल्लवी वाढई, आशाली मोहुर्ले, आकाश चैधरी, प्राची चांदेकर, अक्षय सिडाम, प्रलय वाकडे, पदव्युत्तर अभ्यासक्रमातील ईश्वर मोहुर्ले, राहुल मांदाडे, स्नेहा सोनटक्के, नामदेव भोयर, अल्का घरत, कांचन येनगंटीवार, ऋतीक शेंडे, भाग्यश्री घोडे, रेशमा निकोडे, पुजा ब्रम्हांडभेरीवार, वैष्णवी तुम्मे, क्रिष्णा शेंडे, कमलेश गेडाम, कुणाल खेवले, अपेक्षा नलेंगवार, भाग्यश्री मोहुर्ले, क्रिडा क्षेत्रात नैपुण्यपुर्ण कामगिरी केल्याबद्दल ओंकार भोयर, लिना नागोसे, निखील बर्रेवार, नावेद खान, शंकर कोडापे, अभिनय बावनवाडे आणि सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल साहील शेंडे, सुरेंद्र ठाकरे, मंगेश पिट्टलवार, पायल मेश्राम, गोपिचंद निकोडे, कुनाल नायबनकर, अतुल पेंदोर, पुजा भोयर, पोर्णीमा कोरडे, निशा राऊत, ज्ञानेश्वर मोहुर्ले, मंगेश पिट्टलवार, चंद्रकला लोखंडे आणि अभिषेक साखरे आदि गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यांत आला. गुणवंत विद्यार्थ्यांसोबतचं तालुक्यातील प्रगत व उत्कृष्ट शेतकरी म्हणून विहिरगांव येथील समिर घरत आणि सावली येथील विवेक प्रधाने या शेतक-यांना आ. सुभाष धोटे यांचे हस्ते सन्मानीत करण्यांत आले. आ. सुभाष धोटे यांच्या अध्यक्षीय मनोगतानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला. कार्यक्रमाचे संचलन डाॅ. राजश्री मार्कंडेवार यांनी तर डाॅ. रामचंद्र वासेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे आजी व माजी विद्यार्थी आणि पालकवृंद मोठया संख्येनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here