मुख्याध्यापकाचा मनमानी कारभार, पालकांच्या संमतीवीनाच शाळा सोडल्याचे दाखले अन्य शाळेच्या शिक्षकाला दिले

82

मूल : विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांना शाळा सोडल्याचे दाखले न देता पालकांच्या संमती विनाच दुसऱ्या खाजगी शाळेच्या शिक्षकांना दिल्याचा प्रकार तालुक्यातील कांतापेठ येथे घडला. आर्थिक व्यवहारातुन घडलेल्या या प्रकाराने पालक संतप्त झाले असुन संबंधित मुख्याध्यापकाविरूध्द वरीष्ठांकडे तक्रार करण्यात आली आहे.

जिल्हा परीषद अधिनस्त पंचायत समिती मूल अंतर्गत कांतापेठ येथे जिल्हा परीषदेची प्राथमिक शाळा सुरू आहे. इयत्ता १ ते ४ पर्यंत असलेल्या या शाळेत गांवातील ब-यापैकी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सदर शाळेच्या मुख्याध्यापकाने निकाल लागण्यापुर्वीच पालकांची संमती न घेताच, विद्यार्थीनीचे शाळा सोडल्यांचे दाखले स्वत:च्या मर्जीनेच चिरोली येथील एका शाळेच्या शिक्षकांना दिल्यांने संतप्त पालकांनी कांतापेठ शाळेत आज गोंधळ घातला. मुख्य म्हणजे काल बुध्द पोर्णिमेची सार्वजनिक सुट्टी असतांना, कालच त्यांनी आजच्या तारखा टाकून टि.सी. दिल्यांने सदर प्राकारात आर्थिक व्यवहार झाल्यांचा आरोप पालकांनी मूल पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे, पालकांनी मुख्याध्यापकांच्या कक्षात घातलेला गोंधळाचे​ व्हिडीओ समाजमाध्यमात चांगलेच वायरल होत आहे. शहरासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय मिळावी म्हणुन शासनाने खिरापती घेवुन गांव तेथे शाळा मंजुर केल्या. त्यामुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाणवा दिसत असुन पुरेश्या विद्यार्थ्यां अभावी वर्ग तुकडी बंद पडत असुन परीणामी शिक्षकांवर त्याचा विपरीत परीणाम पडत आहे. त्यामूळे पुरेशी विद्यार्थी संख्या जुळविण्यासाठी शाळाच नव्हे तर कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी शोध मोहीम राबवावी लागत आहे. नोकरी वाचविण्यासाठी शिक्षकांनाही आर्थिक भार सोसावा लागत असुन तहाण भुक आणि वातावरण विसरून शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी पायपीठ करावी लागत असुन त्यातुनच कांतापेठ येथे सदरचा प्रकार घडल्याचे बोलल्या जात आहे. कांतापेठ लगतच्या चिरोली येथील अनुदानीत शाळेत विद्यार्थाची संख्या कमी असल्यांने, पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी चढाओढ सुरू आहे. आपल्याला ​पाचवीचे विद्या​र्थी मिळावे यासाठी प्रत्येक शिक्षक जिल्हा परिषद शाळेत संपर्क साधत असून, जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकांना आर्थिक प्रलोभने दाखविली जात आहे. असाच आर्थिक लाभ मिळविण्यांकरीता कांतापेठ येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दिलीप कुमरे यांनी शाळेचा निकाल लागण्यापूर्वीच सुट्टीचे एक दिवस आधीच सर्व विद्यार्थाच्या शाळा सोडल्याचे दाखले चिरोलीच्या शाळेत परस्पर दिले आहे.
शासनाचे निर्णयानुसार 6 मे रोजी​ निकाल जाहीर करण्यांचे आदेश होते. यानुसार विद्यार्थी आज निकाल घेण्याकरीता कांतापेठ शाळेत गेले असता वर्गशिक्षीकेने अजुन निकाल तयार व्हायचे असल्यांचे सांगीतले, मात्र मुख्याध्यापकांनी तुमचे शाळा सोडल्याचे दाखले चिरोलीच्या शाळेत दिल्यांचे सांगताच, पालकांनी शाळेत धाव घेत आमच्या संमतीशिवाय शाळा सोडल्याचे दाखले दुसऱ्या व्यक्तीच्या हातात कसे दिले ? असा संतप्त सवाल केला. मुख्याध्यापक कुमरे यांचेशी संपर्क साधला असता, होय, मी आजची तारीख टाकून, कालच टिसी दिल्या. हा माझा अधिकार आहे, कोण काय करते ते मी पाहून घेईल, असे उर्मट उत्तर दिले. पालकांचे तक्रारीनुसार गटशिक्षणाधिकारी यांचेशी संपर्क साधला असता, मुख्याध्यापक यांची कृती गंभीर असून, कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया दिली. मिळालेल्या विश्वसनीय माहीतीनुसार, चिरोलीच्या शाळा व्यवस्थापनाकडून मुख्याध्यापक कुमरे यांना प्रति टिसी पाच हजार रूपये दिल्याची परिसरात चर्चा असून या प्रकरणाच्या तक्रारीवर गटशिक्षणाधिकारी कोणती कारवाई करतात याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here