सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष यांचे वाहन चालक श्रीकृष्ण हुड्डा यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप

61

मुल – शेतकऱ्यांच्या हिताची व कल्याणकारी असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत अध्यक्ष महोदय संतोषसिंह रावत यांची गाडी चालक श्रीकृष्ण हुड्डा हे आपल्या सेवेचे ३३ वर्ष सेवा करुन ३० एप्रिल २०२३ रोजी सेवानिवृत्त झाल्याने सी.डी.सी.सी.बँकेतर्फे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे शुभहस्ते पुषपगुच्छ शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन भावपूर्ण निरोप देण्यात आला. श्रीकृष्ण हुड्डा अतिशय प्रामाणिक, निस्वार्थी, निगर्वी व्यक्तीमत्व म्हणून त्याची ख्याती संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण झाली आहे. त्यांना निरोप देण्यासाठी बँकेतील व्यवस्थापन प्रशासक मंगल बुरांडे, कर्ज व्यवस्थापक एस.एस. साहरे,पी. के.राऊत, खंडाळे, उरकुडे, सह व्यवस्थापक ए.बी.लांजेकर,स्टाफ आफिसर बोडे, सुनील वानखेडे, सह. व्य.रामर्तीवार,बँकिंग आफिसर निखाडे, हातगाये, सातपुते, शीतल पोहणे,रश्मी नवले, चित्रा घोडमारे,प्रकाश वासाडे,सुनीता कुरेकर,अशोक पवार, रमकिरण नवघरे, यांचेसह जिल्हा कार्यालयातील सर्व चालक, शिपाई यांनीही कार्यक्रमाला उपस्थित राहून श्रीकृष्ण हुड्डा यांना भावपूर्ण निरोप दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here