अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यासाठी मृतक शिपायाच्या कुटूंबाचे आमरण उपोषण

95

मूल : सेवाकाळात पतीचे निधन झाल्याने शासन निर्णयानुसार अनुकंपा तत्वावर मूलाला नोकरी दयावी, या मागणीसाठी मृतक शिपायाच्या पत्नीने दोन मुलांसह काल पासून प्राणांतीक उपोषणाला सुरूवात केल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे.

स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा मूल, राजोली, अंतरगांव आणि व्याहाड येथे मागील अनेक वर्षापासून विद्यालयाचे संचलन केल्या जाते. चार संस्थेपैकी एक असलेल्या 100 टक्के अनुदानावरील नवभारत कन्या विद्यालय मूल येथे शिपाई पदावर सेवारत असलेले मुनीम उध्दव सिडाम यांचे 24 आँगस्ट 2017 रोजी निधन झाले. शासन निर्णयानुसार कर्मचा-याचे सेवाकाळात निधन झाल्यास त्याचे पश्चात कुटूंबातील एका व्यक्तीला सर्वसंम्मतीने अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याचे निर्देश आहेत. त्यानुषंगाने मृतक मुनिम सिडाम याच्या पत्नी हर्षकला मुनिम सिडाम यांनी मोठा मुलगा आकाश सिडाम याला संस्थेतंर्गत संचलन होत असलेल्या विद्यालयात रिक्त असलेल्या पदावर अनुकंपा तत्वावर नोकरी दयावी. म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाच्या पदाधिका-यां सोबतचं शिक्षणाधिकारी यांना विनंती केली. संस्थेतंर्गत संचलन होत असलेल्या विद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचारी संवर्गाचे अनेक पद सेवानिवृत्तीमूळे रिक्त आहेत. त्यामूळे रिक्त असलेल्या चतुर्थ श्रेणी संवर्गात शासन नियामानुसार पत्रव्यवहार करून अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेणे संस्थेला सहज शक्य आहे. परंतू मागील सहा वर्षापासून सतत पाठपुरावा करत असतांना आणि मुलगा शैक्षणीक व शारिरीक दृष्टया पात्र असतांना संस्थेचे पदाधिकारी मूलास अनुकंपा तत्वावर सेवेत सामावून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. असा आरोप मृतक मुनिम सिडाम यांची पत्नी हर्षकला सिडाम यांनी केला आहे. सतत पाठपुरावा करूनही शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी मुलास अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून न घेता अन्याय करीत असल्याने महागाईच्या काळात कुटूंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण होत आहे. कुटूंबात कोणीही कर्ता व्यक्ती नसल्याने कुटूंब चालवायचा कसा ? असा प्रश्न त्यांचे समोर निर्माण झाल्याने शेवटी न्याय मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी हर्षकला सिडाम यांनी 1 मे पासून शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालीत मूल येथील विद्यालयासमोर मुलगा व मूलीसह प्राणांतीक उपोषणाला सुरूवात केली आहे. संस्थेद्वारा संचालन होत असलेल्या पाच विद्यालय आणि महाविद्यालयात शिक्षकेत्तर संवर्गाचे अनेक पद रिक्त आहेत. त्यामूळे संस्थेला शासन निर्णयानुसार आपल्या मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी देणे सहज शक्य आहे. परंतू संस्थेचे पदाधिकारी असे न करता अनेक बेरोजगार युवकांकडून लाखो रूपये घेवून नोकरी लावून देतो असे सांगून त्यांना रोजंदारी तत्वावर कामावर घेवून बेरोजगारांची पिळवणुक करीत आहे. असा आरोप स्व. मुनिम सिडाम याच्या परिवाराने केला असून महिण्याभरात मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी न दिल्यास नाईलाजास्तव वेगळया आंदोलनाचा पावित्रा घेवू. असा इशारा दिल्याने तालुक्यातील शैक्षणीक वर्तुळात खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here