वाघाने ठार केलेल्या सुर्यभान टिकले यांच्या कुटूंबियास संतोषसिंह रावत यांचे कडून आर्थिक मदत

64

मूल – शेतामध्ये पाणी पाहण्यासाठी गेलेल्या चिचाळा येथील शेतकरी सुर्यभान टिकले वर दबा धरुन बसलेल्या वाघाने जागीच ठार केल्याची घटना शुक्रवारी तालुक्यातील मौजा ताडाळा तुकूम शेतशिवारात घडली. सुर्यभान टिकले यांचा वाघाच्या हल्यात मृत्यु झाल्याने त्याचे कुटूंब वा-यावर पडले. त्यांचे पश्चात पत्नी कमलाबाई, मुले ईश्वर व रुपेश असा परिवार आहे. मृतक सुर्यभान टिकले यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी काँग्रेसचे नेते सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष व माजी जी.प.अध्यक्ष संतोष सिंह रावत हे मृतकाच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन करुन स्वतः कडून दहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गुरु गुरनुले, माजी संचालक डॉ.पद्माकर लेनगुरे, आदर्श खरेदी विक्री सहकारी सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे, तेजराज ठेमस्कर, बालाजी निकूरे, चालदेव मांदाडे, बबलू गांडलेवार, मुन्ना मडावी, सूरज इतकेलवार, ग्रा. प सदश जनार्दन आत्राम, कृष्णाजी टिकले, सुभाष मंकीवार, अनुप लेंनगूरे, श्रीनिवास टिकले, उपसरपंच सूरज चलाख, पोलिस पाटील दुर्गे, माजी उपसरपंच यशवंत चलाख, पवन बलगेलवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते. वाघाने शेतकऱ्यावर झडप घेवुन एफ.डी.सी.एम.५२२ कक्षात त्याच्याच शेतात त्याचा घोट घेतल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत संतोषसिंह रावत यांनी कुटुंबियांसमोर वनविभागाचे अधिकारी सहाय्यक वनसंरक्षक आदेश शेडगे यांना मोबाईल वर बोलून वनविभागाकडून तात्काळ पूर्ण आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली. तसेच वन्य प्राण्यांपासुन होणारे शेतीचे नुकसान थांबविण्यासाठी बंदोबस्त करावा व वणाला तारेचे कुंपण करावे अशी मागणी रावत यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here