मूल : एकात्मीक बाल विकास प्रकल्प अंतर्गत राजोली क्षेत्रातील अंगणवाडी सेवीका आणि मदतनीसांच्या सहकार्याने राष्ट्रीय पोषण आहार अभियान नुकताच साजरा करण्यांत आला. तालुक्यातील आकापूर येथील अंगणवाडी केंद्रात पार पडलेल्या राष्ट्रीय पोषण आहार अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन आकापूर येथील सरपंच भाष्कर हजारे यांचे हस्ते झाले. एकात्मीक बाल विकास प्रकल्प अधिकारी निलेश चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापीका कुलोत्पना कुळमेथे, पोलीस पाटील रमेश येरमे, शिक्षक सुधीर चिंतलवार आणि राजोली क्षेत्राच्या पर्यवेक्षीका लिना जंबुलवार उपस्थित होत्या, कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन आणि दिपप्रज्वलन करून केले. यावेळी श्रावस्ती समीर कुंभारे हया बालकीकेने नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगणवाडी सेवीका स्वाती तोडासे यांनी केले, यावेळी मनोगत व्यक्त करताना सरपंच भाष्कर हजारे, पोलीस पाटील रमेश येरमे आणि मुख्याध्यापीका कुलोत्पना कुळमेथे यांनी पोषण आहाराचे महत्व सांगीतले. कार्यक्रमा दरम्यान दोन गटात सुदृढ बालक स्पर्धा घेण्यात आली. सहा महिणे ते तीन वर्ष पर्यंतच्या वयोगटात रियांश गणेश हजारे हा बालक प्रथम तर प्रणीता जितेंद्र आत्राम ही ३ ते ६ वयोगटात प्रथम क्रमाकाचे मानकरी ठरले. पोषण आहार अभियानातंर्गत क्षेत्रातील अंगणवाडी सेवीका आणि मदतनीसांनी विविध पोषण आहाराचे उत्कृष्ठ सादरीकरण केले होते. संध्याकाळी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापीका कुलोत्पना कुळमेथे यांचे हस्ते विजेत्या बालकांना बक्षीसाचे वितरण करण्यांत आले. कार्यक्रमाचे संचलन तनुजा मोगरे आणि आभार सुरभी राऊत यांनी मानले. कार्यक्रमाला परिसरातील पालकवृंद मोठया संख्येनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षिका लिना जंबुलवार यांचे मार्गदर्शनात राजोली क्षेत्रातील अंगणवाडी सेवीका आणि मदतनीस यांनी परिश्रम घेतले.