पीक पेऱ्यानुसार शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करावे, आमसभेत ठराव मंजूर

54

मूल – तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्था मूल ची आमसभा नुकतीच संपन्न झाली, सभेचे अध्यक्ष संदीप कारमवार उपाध्यक्ष अरविंद बोरुले संचालक राकेशभाऊ रत्नावार रवि कामडी विवेक मुत्यलवार मनोज मुत्यलवार ,भोजराज गोवर्धन, सौ. चंदा कामडी तर शेतकरी सभासद राहुल मुरकुटे देवानंद गेडाम व ईतर शेतकरी उपस्थित होते. सचिव संजय बद्दलवार यांनी विषय पञीकेनुसार सभेला सुरवात केली. सर्व विषयांवर साधक बाधक चर्चा करुन विषय मंजूर करण्यात आले. अध्यक्ष यांनी वेळेवर च्या विषयांवर तालुक्यात सध्या धानासह कापुस/ सोयाबीन/ मका/ मीरची व ईतर पिकांची पेरणी चे प्रमाण वाढले असल्याने जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपुर यांनी शेतकऱ्यांच्या पिक पे-यानुसार शेतकऱ्यांना कर्ज मंजुर करावे. असा विनंती ठराव सर्वानुमते पारीत करण्यात आला, नंतर संस्थेचे अध्यक्ष संदीप कारमवार यांनी संस्थेची प्रगती, वाटचाल वसुली व पुढील संकल्प आणि योजना दुकानगाळे व गोदाम बांधकाम करणे व संस्थेचे औषध व खत विक्री केंद्र सुरु करुन शेतकरी सभासदांच्या हितासाठी संस्था अत्यावश्यक निर्णय घेऊन विकास करेल असे मनोगत उपस्थित सभासदांना अवगत करुन दीले. अनेक सभासदांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here