नवभारत कन्या विद्यालयात दहावीची परीक्षा शांततेत सुरू, भरारी पथकाकडून परीक्षा केंद्राची पाहणी

91

मूल : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने आज पासून घेण्यात येत असलेल्या इयत्ता दहावी परीक्षेच्या मूल येथील नवभारत कन्या विद्यालय येथील परीक्षा केंद्रास नायब तहसीलदार यशवंत पवार यांच्या नेतृत्वात भरारी पथकाने भेट देवुन केंद्राची पाहणी केली. यावेळी नायब तहसीलदार ठाकरे, मंडळ अधिकारी दीपक गोहने, महेश कडवलवार आदी उपस्थित होते.

केंद्र संचालक एस. एस. पुराम, सहाय्यक केंद्र संचालक एम.आर. भेंडारे यांनी परीक्षेला एकूण बसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती दिली. सदर केंद्रामध्ये तालुक्यातील नवभारत कन्या विद्यालय, नवभारत विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्यालय, स्व.बापूजी पाटील मारकवार विद्यालय राजगड, विश्व शांती विद्यालय मारोडा, देवनील विद्यालय टेकाडी या सहा विद्यालयातील एकूण 263 विद्यार्थी, विद्यार्थीनी परीक्षेला उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. पुरेश्या पोलीस बंदोबस्तात सुरू झालेल्या इयत्ता दहावीच्या सदर परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था व्यवस्थित व पध्दतशीर असुन शांततेत परीक्षा सुरू असल्याने नायब तहसीलदार यशवंत पवार यांच्या नेतृत्वातील पथकाने समाधान व्यक्त केले. सदर पथकाने शहरातील अन्य परीक्षा केंद्रालाही भेटी देत पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here