मूल : चंद्रपूर आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार तथा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांचे पती सुरेश उर्फ बाळूभाऊ धानोरकर यांचे दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल मध्ये मंगळवारी पहाटे ३ वाजता आजाराने दुःखद निधन झाले. खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने शनिवारी (२९ मे) रोजी नागपूर येथील खाजगी रुग्णालयात किडनी स्टोन वर उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. (२८ मे) रोजी त्यांच्या पोटात दुखत असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी विशेष एअर ॲम्बुलन्सने दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल येथे हलवण्यात आले होते, दिल्ली येथील वेदांता हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान आज पहाटे त्यांचे निधन झाले. स्व. बाळुभाऊ धानोरकर यांना मूल टुडे च्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली.