मूल : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचेवर ११ मे २०२३ रोजी रात्रो ९.१९ वाजता गोळीबार केल्याच्या कारणावरून पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या राजविर यादव आणि त्याचा लहान भाऊ अमर यादव यांना मूल येथील प्रथम श्रेणी न्यायदंडिधिकारी यांचे न्यायालयात सादर केले असता प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी मुख्य आरोपी राजविर यादव याला दोन दिवसाची (३१ मे पर्यंत) तर सहआरोपी अमर यादव याला न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावाली. यापुर्वी दोन्ही आरोपींना २९ तारखेपर्यंत चंद्रपूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी पोलीसांना पुढील तपास करण्यासाठी मदत व्हावी म्हणुन पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. पाच दिवसाच्या पोलीस कोठडीच्या काळात पोलीस अधिकाऱ्यांनी हल्ल्याकरीता वापरण्यात आलेली मायझर बंदुक, वाहन आणि इतर साहीत्य हस्तगत केले आहे. पुढील दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत पोलीसांच्या गळाला पुन्हा काही लागते की काय ? याकडे जनतेचे लक्ष लागले असुन रावत यांचेवरील जीवघेण्याच्या घटनेत पुन्हा काही साथीदार असल्याची चर्चा असल्याने पुढील तपासात काय निष्पन्न होते. हे येणाऱ्या दिवसात उजेडात येणार आहे. घटनेचा तपास पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी सुशिल नायक सहकारी स्थानीय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार आणि मूलचे ठाणेदार सुमित परतेकी व सहका-यांच्या मदतीने करीत आहेत.