पोलीसांच्या दुर्लक्षामूळे जीवीताला धोका, प्रतिभा मारगोनवार यांचा आरोप, कारवाई न केल्यास दिला आत्मदहनाचा इशारा

80

मूल : दारूची बेकायदेशीर विक्री करणा-या व्यक्तीकडून वारंवार विनयभंग करण्याचा प्रयत्न होत असून त्यांचेपासून धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात पोलीसात तक्रार करूनही पोलीस बघ्याची भूमीका घेत असून दारूची अवैद्य विक्री करणा-याला अभय देत असल्याने भविष्यात आत्मदहन करावे लागेल. असा इशारा प्रतिभा मारगोनवार यांनी दिला आहे.

आयोजीत पत्रकार परिषदेत बोलतांना तालुक्यातील बेंबाळ येथील प्रतिभा बाबुराव मारगोनवार यांनी सोडचिट्टी न देता पतीने दुस-या स्त्री सोबत लग्न केल्यामूळे मागील काही वर्षापासून माहेरी राहत आहे. आपण पदव्युत्तर असून योग कार्यकर्ती म्हणून कार्यरत आहे. वडीलांच्या निधनानंतर वृध्द आई सोबत जीवन जगत असतांना घराशेजारी राहणारे संजय तेलकुंटावार यांचेपासून आपल्याला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. घटस्फोटीत असल्याची संधी साधून आपल्यावर वाईट नजर ठेवून असलेले संजय तेलकुंटावार कोणत्या ना कोणत्या कारणावरून विनयभंग करण्याचा प्रयत्न करीत असून गावांत विनाकारण बदनामी करीत आहे. रस्त्यावर थांबवून बलात्कार करण्याची धमकी देणे, अश्लील शब्दात टोमणे मारणे, प्रसंगी जीवे मारण्याची धमकीही देत असतो. संजय तेलकुंटावार हे दारूची बेकायदेशीर विक्रेते असून त्यांना पोलीसांचे संरक्षण आहे. संजय तेलकुंटावार यांचे विरूध्द मी अनेकदा पोलीसात तक्रार नोंदवली, परंतू पोलीसांनी आजपर्यंत संजय तेलकुंटावार विरूध्द कोणतीही कारवाई केलेली नाही. तक्रार करूनही पोलीसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने संजय तेलकुंटावार यांची हिंम्मत दिवसेंदिवस वाढत असून घरासमोर येवून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार त्यांचे कडून राजरोसपणे सुरू आहे. त्यामूळे आपण प्रचंड माणसीक तणावात आहोत. संजय तेलकुंटावार यांचे कडून होत असलेला माणसीक तणाव दूर करण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी लक्ष दयावे, अशी विनंती करतांनाप्रतिभा मारगोनवार यांनी न्याय न मिळाल्यास आत्मदहन करू. असा इशारा प्रतिभा मारगोनवार यांनी निवेदनाद्वारे दिल्याचे सांगीतले.

प्रतिभा मारगोनवार यांच्या तक्रारीनुषंगाने संजय तेलकुंटावार यांचे विरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून पोलीसांकडून झालेल्या कारवाई मूळे सध्यास्थितीत असे कोणतेही अनुचीत कृत्य तेलकुंटावार यांचे कडून घडल्याचे निदर्शनास आले नाही.

सतिश बंसोड, सहायक पोलीस निरीक्षक मूल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here