रावत यांचेवर झालेल्या गोळीबाराने निर्माण झाले अनेक प्रश्न, गोळी झाडणारा सापडला जाईल. पोलीस अधिकाऱ्यांना विश्वास

68

मूल : विविध क्षेत्रात कार्यरत असतांना एखादयाने जीवघेणा हल्ला करावा असे कोणाशी वैरत्व नाही, व्यवसायानुरूप स्वभाव थोडासा फटकळ असला तरी क्षणात खांदयावर हात ठेवून आपुलकी, जिव्हाळा आणि मदतीचा हात देणारा, परमेश्वराप्रती नितांत श्रध्दा आणि वृत्ती धार्मिकतेची असल्याने एखादयाने त्यांचेवर गोळीबार करावा. ही घटना अविश्वसनिय असली तरी वास्तविक असल्याने अनेक प्रश्न चर्चील्या जात आहे. पोलीस प्रशासन घटनेचा तपास युध्दपातळीवर करीत असले तरी दहा दिवस होवुनही आरोपी मोकाट असल्याने सदर घटना भविष्यात वेगळे वळण घेईल. असे बोलल्या जात आहे.

११ मे २०२३ रोजी रात्रो ९.१९ वाजता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी निवडी संबंधी सहका-यांशी चर्चा करून बॅंकेच्या संचालक कक्षाकडून स्वगृही जात असतांना स्विप्ट कार मध्यें दबा धरून बसलेल्या माथेफिरू त्यांचेवर गोळी झाडून पसार झाला. संतोष रावत यांनी प्रसंगावधान राखल्याने ते सुरक्षीत राहीले. त्यांच्या डाव्या हाताच्या बंधाला गोळी चाटुन गेली. विविध क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तीमत्व असलेल्या संतोष रावत यांचेवर गोळीबार झाल्याची घटना क्षणात वा-यासारखी पसरली. पाहता पाहता घटनास्थळी हजारोच्या संख्येने नागरीक गोळा झाले. घटनेची माहिती होताच उपविभागीय अधिकारी आणि ठाणेदारही तातडीने सहका-यांसह घटनास्थळी पोहोचले. आरोपीच्या शोधार्थ जिल्हयाभर नाकेबंदी करण्यांत आली. मूल पासून मुंबईपर्यंतची पोलीस यंत्रणा युध्दपातळीवर कामाला लागली. परंतू बंद असलेले शहरातील अनेक सिसिटीव्ही कॅमेरे आणि वाहणावर वापरलेला चुकीचा क्रमांक यामूळे आरोपीचा शोध लावण्यास अद्यापही पोलीसांना यश आले नाही, राजकिय क्षेत्रात वजनदार व्यक्तीमत्व असलेले संतोष रावत यांचेवर वाहणामधून उतरून गोळीबार व्हावा. ही घटना आश्चर्यजनक असून तेवढीच अविश्वसनीय होती. परंतू घटना घडल्याची वास्तविकता जेव्हा वा-यासारखी पसरली तेव्हा रावत यांच्या सहका-यांचे मोबाईल क्षणाक्षणात खणखणू लागले. अनेकजण तर्क वितर्क लढवू लागले. विविध क्षेत्रात सक्रिय असणा-या रावत यांचे शत्रु कोण असावे. असा अंदाज अनेकजन बांधु लागलेे. पोलीसांनीही त्यादृष्टीने तपास चक्रे फिरवली. परंतू अद्याप गोळीबार करणारा आणि त्याला गोळी चालविण्यास सांगणारा तो म्होरका पडदयासमोर आलेला नाही. राजकारणातून रावत यांचेवर गोळी चालविण्यात आली. अशी विश्वसनीय चर्चा जरी असली तरी खरा सुत्रधार राजकारणी कोण. याविषयी मूल शहराच्या कानाकोप-यात चर्चा होत असून जर कां सुत्रधार तो असावा. तर यावेळेस मात्र त्याच खरं नाही ! अशी रावत हितचितंकामध्यें दबक्या आवाजात चर्चा आहे. हे जरी खरं असलं तरी सध्यास्थितीत संतोष रावत यांचेवर झालेला गोळीबार अनेक प्रश्न उत्तर शोधायला भाग पाडत आहेत. रावत यांचेवर गोळीबार करणा-या अज्ञात व्यक्तीचा शोध लावण्यासाठी विविध संघटना आणि मातब्बर मंडळी समोर येत असून माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. जिल्हयातील एका वजनदार राजकिय व्यक्तीवर गोळीबार होवूनही पालकमंत्री शांत कसे ? असा प्रश्न घटनेच्या तिन दिवसानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत करतांना विजय वडेट्टीवार यांनी आंदोलन काळात अनुचित प्रकार घडल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील. असे ठणकावून सांगीतल्याने आता पालकमंत्रीही कामाला लागले आहे. ज्या शहरात गोळीबाराची घटना घडली त्या शहराशी नाळ राज्याचे विद्यमान गृहमंत्री यांचेशी जुळली असल्याने त्यांनीही पोलीस प्रशासनातील तज्ञ मंडळींना आरोपीच्या शोधासाठी कामाला लावले आहे. एकंदरीत पोलीस प्रशासनातील अनेक मातब्बर आणि अनुभवी तज्ञ आरोपीच्या शोधार्थ प्रयत्नरत असल्याने आज ना उदया आरोपी पडदयासमोर येईल. असा विश्वास व्यक्त केल्या जात आहे. हे जरी खरं असले तरी संतोष रावत यांचेवर झाडलेल्या गोळीने अनेक प्रश्न निर्माण केले आहे. हे तेवढेच खरं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here