काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद, कोसंबी, मारोडा, आदर्शखेडा, उश्राळा,भादुर्णी येथील जनतेशी साधला संवाद

65

मूल – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या निर्देशान्वये जनसंवाद पदयात्रेचा शुभारंभ गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थानिक चरखा संघ परीसरामधुन झाला. काँग्रेस नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व जि. प. अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे हस्ते झाला. चरखा संघामधुन निघालेल्या पदयात्रेत काँग्रेसचे महिला, पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते, काँग्रेस प्रेमी जनता मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकभावना जाणून घेण्यासाठी भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर जनसंवाद पदयात्रेच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या हुकूमशाहीने सुरु असलेल्या महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकरी दुष्काळ, वन्यप्राण्यांचे हल्ले, भ्रष्टाचार, लोकशाहीची हत्या संबंधित मुद्दे आणि स्थानिक पातळीवरील विविध मुद्यांबाबत मुल, कोसंबी, मारोडा, आदर्श खेडा, उश्राळा, भादुर्णी येथील जनतेशी संवाद साधला. भादुर्णी येथे विक्रम गुरनुले यांचे नेतृत्वात ग्रामस्थांनी जनसंवाद पदयाञेचे स्वागत केले. यावेळी भादुर्णी येथील चौकात सभा घेण्यात आली. सभेला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, ओबीसी राज्य सरचिटणीस गुरुदास चौधरी यांनी नागरिकांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. मंगेश बत्तुलवार यांनी आभार मानले. पदयात्रेत काँग्रेस नेते संतोषसिंह रावत, बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, माजी तालुका अध्यक्ष घनश्याम येनुरकर, सेवादलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेव गावतुरे, शशिकला गावतुरे, बाजार समिती संचालक संदीप कारमवार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अखिल गांगरेड्डीवार, ग्रामीण काँग्रेसचे राजू पाटील मारकवार, माजी सभापती दशरथ वाकुडकर , युवक काँग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार, दीपक वाढई, सरपंच चांगदेव केमेकर, संचालक हसन वाढई, शहर अध्यक्ष सुनील शेरकी, संचालक किशोर घडसे, लहू कडस्कर, विनोद कांमडे, औद्योगिक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय समर्थ, राजेंद्र वाढई, गुलाब पठाण, शहर उपाध्यक्ष संदीप मोहबे, सुरेश फुलझेले, शहर महासचिव कैलास चलाख, गंगाधर घुगरे, महिला तालुका अध्यक्षा रुपाली संतोषवार, शहर अध्यक्ष नलिनी आडपवार, माजी नगर सेविका लीना फुलझेले, सचिव शामला बेलसरे, कोषाध्यक्ष राधिका बुक्कावार, सदस्या फरजाना शेख, नाजुका लाटकर, समता बनसोड, युवक शहर अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार, मंकीवार, चंदू चटारे, रामदास गुरनुले, भाऊजी लेनगुरे, संदीप वाढई, छोटू रावत, राजेश गावतुरे, गुज्जनवार, विनोद कामडे, सरपंच रवी कामडे, उपसरपंच साहिल येनगंटीवार, शेख, संचालक जवादे, यांचेसह तालुका व शहर काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते, बहुसंख्येने उपस्थित होते. पदयात्रेची सांगता कोसंबी येथे झाली. यावेळी सरपंच रवींद्र कामडे यांचे वतीने स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here