मँच फिक्सींगचा काळ गेला. बल्लारपूर क्षेञाचा भावी आमदार काँग्रेसचाच होईल, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांचे मूल येथे जंगी स्वागत

45

मूल : भुतकाळाचा विचार आता करू नका, प्रवाहाचा विरूध्द दिशेने पोहुनही आपण कित्येक वर्षापासुन काँग्रेसच्या बळकटीसाठी प्रयत्न करीत आहात. याचा अभिमान असुन आता मँच फिक्सींग होणार नाही. तो काळ गेला असुन क्षेञाचा पुढील आमदार काँग्रेसचा राहील. यासाठी प्रयत्नशील राहील. असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांनी दिले.

काँग्रेसच्या वतीने काढण्यात येत असलेल्या जनसंवाद याञेनिमित्य जिल्ह्यात आलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले काल चंद्रपूर येथुन गडचिरोली कडे जात असताना राञो ९.४५ वा. दरम्यान त्यांचे स्थानिक गांधी चौकात जंगी स्वागत करण्यात आले. आ. पटोले यांच्या आगमना निमित्य काँग्रेस भवन येथे मार्गदर्शनाचा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी काँग्रेसचे संघटक नाना गावंडे, वडसा येथील माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी उपस्थित होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत आणि सहका-यांच्या वतीने आ. नाना पटोले यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देवुन सत्कार करण्यात आल्यानंतर संतोषसिंह रावत यांनी तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना बोलुन दाखवतांना आपले पायगुण चांगले असल्याने पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्याने पाऊस मिळाला. असे म्हणत नानाभाऊच्या पक्षकार्याची प्रशंसा केली. क्षेञात भाजपाचा आमदार आणि मंञी असतांना तालुक्यात काँग्रेस आघाडीवर आहे. परंतु सत्ता नसल्याने प्रशासनाकडून सातत्याने अन्याय सहन करावा लागत आहे. अशी खंत व्यक्त करतांना भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तालुक्याला नेतृत्वाची संधी द्यावी. अशी आग्रही विनंती संतोषसिंह रावत यांनी बोलुन दाखविली. यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपले नेते खा. राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंतच्या भारत जोडो याञेचे अनुकरण करत आपण जनसंवाद याञेचे नियोजन केले असल्याचे सांगतांना याञेला मिळत असलेला प्रतिसाद लक्षात घेतल्यास राज्यात यावेळी सत्तांतर अटळ असल्याचे सांगितले. सध्याची स्थिती काँग्रेस करीता अनुकुल असुन मत आणि मनभेद दुर ठेवुन काम करा. संधी न गमवता संधीचे सोने करा, अन्यथा आपल्या सारखे कपाळ करंटे लोक नाही. हे लक्षात घेवुन कामाला लागा. असे आवाहन केले. काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनिल शेरकी यांनी संचलन आणि गुरू चौधरी यांनी आभार मानले. यावेळी तालुकाध्यक्ष गुरू गुरनुले, महीला अध्यक्ष रूपाली संतोषवार, नलीनी आडेपवार, युवक अध्यक्ष पवन निलवार, बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, माजी तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अखील गांगरेड्डीवार, बाजार समिती उपसभापती राजेंद्र कन्नमवार, संचालक संदीप कारमवार, किशोर घडसे, हसन वाढई, दिपक वाढई यांचेसह तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी युवक आणि महीला कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here