मूल : भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा मूल नगर परीषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांची दुरसंचार मंत्रालय भारत सरकारच्या आदेशानुसार दुरसंचार विभागाच्या जिल्हा सदस्य पदी करण्यात आली.नंदकिशोर रणदिवे हे मूल तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आहेत. सोबतच त्यांनी मूल नगर परीषदेचे उपाध्यक्ष म्हणुनही कामकाज सांभाळले आहे. त्याच्या अनुभवाचा फायदा दुरसंचार विभागातील अडचणी आणि दुरसंचार विभागाच्या ग्राहकांना येणाऱ्या अडीअडचणी सोडण्यासाठी त्याच्या अनुभवाचा फायदा व्हावा हया उद्देशाने त्यांच्यावर ही महत्वाची जबाबदारीं सोपवीण्यात आली.
त्यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांना दिलें आहे. नंदकिशोर रणदिवे यांच्या नियुक्तीचे तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी स्वागत केले असुन त्याचे कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.