सुमीत समर्थ यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या चंद्रपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष पदी नियुक्ती

67

मूल : राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे स्थानिक युवा नेते तथा बल्लारपूर विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे पक्षाचे अध्यक्ष सुमीत सुरेशराव समर्थ यांची नुकतीच चंद्रपूर जिल्हा ग्रामीण युवक काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यांत आली आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण केंद्र येथे संपन्न झालेल्या बैठकी नंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे हस्ते सुमीत सुरेशराव समर्थ यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. सुमीत समर्थ हे शरद पवार यांचे खंदे समर्थक असून निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. तालुक्यात केलेले पक्ष कार्य, विविध आंदोलन आणि संगठण बांधणीची दखल घेवून राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील आणि राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुबभाई शेख यांनी सुमीत समर्थ यांची चंद्रपूर जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस पार्टीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमानंतर सुमीत समर्थ यांना शरद पवार यांचे हस्ते नियुक्ती पत्र देण्यांत आले. यावेळी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, चंद्रपूर शहर अध्यक्ष दिपक जयस्वाल, नागपूर जिल्हा महिला अध्यक्ष जयाताई देशमुख, युवक काॅंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय ठाकुर उपस्थित होते. जिल्हयात युवकांची फळी तयार करून राजकारणापेक्षा समाजकारण करून जिल्हयात राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी सशक्त करून शरद पवार यांचे हात बळकट करू. असा विश्वास नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुमीत समर्थ यांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here