दुय्यम निबंधक वैशाली मिटकरी विरूध्द लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

45

मूल : खरेदी केलेल्या शेतजमीनीच्या दस्तऐवजांवर नावांची नोंद करण्यासाठी आवश्यक असलेले दस्तऐवज तयार करून दस्ताची मुद्रांक व नोंदणी फी बाबत विचारणा केली असता स्थानिक दुयम निबंधक यांनी शुल्का व्यतिरीक्त १५ हजार रूपयाची मागणी केली. परंतु तक्रारदारास शुल्का व्यतिरीक्त रक्कम देण्याचे मान्य नसल्याने शेवटी तडजोडी अंती पंचासमक्ष १० हजार रूपये स्विकारल्याने चंद्रपूर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मुल्यांकन दुयम निबंधक वैशाली मिटकरी यांना ताब्यात घेतल्याची घटना काल मूल येथे घडली. तक्रारदार हा मारोडा येथील रहीवासी असून दस्तलेखनाचे काम करतो. पक्षकाराने खरेदी केलेली शेतजमीन नांवाने करण्यासंबंधीची कार्यवाही पुर्ण करण्यासाठी आवश्यक असलेले दस्तऐवज मिळण्याकरीता तक्रारदार दस्तलेखकाने येथील मुल्यांकन दुयम निबंधक कार्यालयात दस्तऐवज सादर केले. दाखल केलेल्या दस्तऐवजांनुसार नियमानुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क स्विकारून मागणी केलेले दस्तऐवज उपलब्ध करून देणे मुल्यांकन दुयम निबंधक कार्यालयाचे काम होते. परंतू असे न करता मुल्यांकन दुयम निबंधक वैशाली मिटकरी यांनी तक्रारदार दस्तलेखकाकडून १५ हजार रूपयाची मागणी केली. परंतू तक्रारदारास मिटकरी यांना १५ हजार रूपये देण्याची इच्छा नव्हती. त्यामूळे त्यांनी चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीवरून सापडा रचून तडजोडी १० हजार रूपयाची लाच स्विकारल्याने वैशाली मिटकरी यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील सहका-यांच्या मदतीने करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here