ना.विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नाने मुल कृ.ऊ.बा.समिती येथे धान खरेदीसाठी नोंदणी केंद्राला मंजुरी

54

मूल – खरीप हंगाम मधिल धान काढणीला येत्या काही दिवसात सुरूवात होणार आहे. नविन हंगामातील धानाला बाजारपेठेत शासकीय हमीभावा पेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थीक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शासकीय हमीभाव केंद्रावर धान विक्री केल्यास सदर धानास शासकीय हमीभाव मिळुन शेतकऱ्यांचा आर्थीक फायदा होतो, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मूल येथे खरेदी केंद्र सुरु करण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी बाजार समितीच्या संचालक मंडळाने काँग्रेस नेते संतोषसिंहा रावत आणि सभापती राकेश रत्नावार यांचे नेतृत्वात केली होती. सदर मागणीची दखल घेवुन राज्याचे विरोधी पक्ष नेते ना.विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रपूर यांचेशी चर्चा करून बाजार समितीला नोंदणी केंद्र सुरू करण्यास मंजुरी प्रदान केली. त्यामूळे तालुक्यातील शेतकरी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, सभापती राकेश रत्नावार,उपसभापती राजेंद्र कन्नमवार, माजी सभापती तथा विद्यमान संचालक घनश्याम येनुरकर, संचालक अखिल गांगरेड्डीवर, राहुल मुरकुटे, सरपंच चांगदेव केमेकर ,युवक काँग्रेस अध्यक्ष पवन निलमवार, खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम भुरसे, संचालक हसन वाढई,विनोद कामडी आदींनी समाधान व्यक्त केले असुन ना. वडेट्टीवार यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here