रावत यांचेवर गोळी चालविणारे भावंड पोलीसांच्या ताब्यात, सुञधाराच्या अटकेसाठी तिव्र आंदोलनाचा इशारा, चंद्रपूर पोलीसांची प्रशंसनिय कामगिरी

152

मूल : ११ मे २०२३ रोजी रात्रो ९.१९ वाजता चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे वर गोळीबार करून पसार झालेल्या आरोपीला पकडण्यात चंद्रपूर पोलीसांना यश आले आहे. गोळीबार करून दहशत पसरविल्याचे कारणावरून पोलीसांनी बाबुपेठ येथील राहत्या घरून दोन भावांना आज पहाटे ताब्यात घेतल्याने राजकीय क्षेञात खळबळ माजली आहे. उत्तर भारतीय काँग्रेस सेलच्या पदाधिकारी असलेला मारेकरी एका ज्येष्ठ नेत्याचा खंदा सहकारी असल्याने त्या घटनेचा सुञधार म्हणुन त्या नेत्याकडे बघीतल्या जात आहे. पोलीसांनी त्या नेत्याला पडद्या समोर न आणल्यास तिव्रआंदोलन करू. असा इशारा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दिला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकारी निवडी संबंधी सहका-यांशी चर्चा करून बॅंकेच्या संचालक कक्षाकडून स्वगृही परत जात असतांना स्विप्ट कार मध्यें दबा धरून बसलेल्या आरोपींनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे वर गोळी झाडून पसार झाले होते. संतोष रावत यांनी प्रसंगावधान राखल्याने ते सुरक्षीत राहीले. तेव्हापासुन चंद्रपूर पोलीस सर्व युक्त्यांचा वापर करत आरोपींच्या मागावर होती. सबळ पुराव्या अभावी आरोपींपर्यंत पोहोचता येत नसल्याने शेवटी नव्या युक्तीचा वापर करत आज पहाटे चंद्रपूर पोलीस आरोपी पर्यंत पोहोचले. काँग्रेसच्या एका आघाडीचा मुख्य पदाधिकारी असलेल्या राजविरसिंग आणि त्याच्या भावाला तपासी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुशील नायक आणि शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतिशसिंह राजपुत यांनी सहका-यांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे. पोलीसांच्या ताब्यात असलेल्या राजविरसिंग आणि त्याच्या भावाने नोकर भरती करीता दिलेले पैसे संतोषसिंह रावत परत देत नसल्याने त्यांचेवर गोळी चालवली. असे बयाण दिल्याचे समजते. परंतु संतोषसिंह रावत यांनी आजपर्यंत कोणाकडूनही भरतीच्या नावांखाली पैसे घेतले नसुन ते स्वतः विविध सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक उपक्रमासाठी देणगी किंवा दान स्वरूपात पैसे देत असतात. याशिवाय अन्य काही बाबींची वास्तविकता लक्षात घेतल्यास घटनेला वेगळेच कारण असावे. अशी शंका पोलीस अधिकाऱ्यांना आली आहे. त्यामूळे घटनेचा सखोल तपास चालविला असुन मुख्य कारण शोधल्याशिवाय शांत बसणार नाही. असा निर्धार पोलीस अधिक्षक रविंद्रसिह परदेसी आणि तपासी अधिकारी सुशील नायक यांनी केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात घटनेच्या मुख्य कारणांसह मुख्य सुञधार पडद्या समोर येईल. अशी चर्चा आहे.

काँग्रेस नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचेवर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पोलीसांनी अटक केली असली तरी घटनेचा मुख्य सुञधार अजुनही पडद्याआड आहे. त्यामूळे मुख्य सुञधाराला अटक करावी. अन्यथा माजी मंञी विजय वडेट्टीवार यांचे नेतृत्वात तिव्र आंदोलन करू. असा इशारा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here