मूल : गोळीबार प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींनी केलेला आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप धादांत खोटा असुन घटनेतील गाँडफादरला वाचविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे केलेल्या आर्थिक व्यवहाराच्या आरोपाची आरोपी, त्याचा गाँडफादर आणि आपली नार्कोटेस्ट केल्यास दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. असा विश्वास गोळीबार घटनेत सुखरूप असलेले चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केला.
काल पोलीस प्रशासनाच्या वतीने आयोजित केलेल्या पञकार परीषदेत बोलताना जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रसिंग परदेशी यांनी घटनेतील आरोपीनी वेकोली मध्ये नोकरी लावुन घेण्यासाठी फिर्यादीला ६ लाख रूपये दिले. दिलेली रक्कम परत मिळत नसल्याने आरोपी यादव बंधुंनी संतप्त होवुन फिर्यादीवर गोळी झाडल्याचे बयाण दिले असल्याचे पोलीस अधिक्षक यांनी सांगीतले. त्या बयाणासंबंधी रावत यांची भेट घेवुन प्रतिक्रिया जाणुन घेतली असता रावत यांनी आरोपींचे बयाण निराधार असुन तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची दिशाभुल करणारे असल्याचे सांगितले. आरोपीच्या बयाणावरून पोलीस अधिक्षक यांनी पञकार परीषदेत वार्तालाप करतांना नोंदविलेले मत आपली बदनामी करणारे असुन यासंबंधी आपण कायदेशीर दाद मागणार असल्याचे रावत यांनी सांगीतले. पुढे मत व्यक्त करतांना रावत यांनी गोळीबार केल्याच्या पुराव्यावरून पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींना आपण ओडखत नसुन कधीही त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आलेला नाही. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणुन एखाद्या कार्यक्रमात अनावधानाने त्याची भेट झाली असेल तर सांगता येत नाही. पण आपली त्याची भेट झाली नाही आणि ज्याचेशी आपला अर्थाअर्थी कोणताही संबंध नाही त्या वेकोली मध्ये नोकरी लावुन देण्यासाठी रक्कम घेण्याचा प्रश्नचं उदभवत नाही. असे ठासुन सांगितले. पोलीसांच्या ताब्यात असलेले यादव बंधु जर कां आपल्या विरूध्द रक्कम घेतल्याचा आरोप करीत असतील तर पोलीसांनी त्या आरोपाच्या मुळापर्यंत जावुन तपास करावा. आरोपी आणि आरोपीला माझे विरूध्द बयाण देण्यासाठी भाग पाडणारा व आपली नार्को तपासणी करावी. गुप्तचर यंञणे मार्फत आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हावी. त्याशिवाय दुध का दुध आणि पाणी का पाणी होऊन घटनेतील मास्टरमाईंड समोर आल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास संतोषसिंह रावत यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलतांना सांगीतले. घटनेत जबाबदार असलेल्या यादव बंधुना पोलीसांनी ताब्यात घेतल्या नंतर वेगवेगळ्या प्रसार माध्यमा मधुन त्यांच्या विविध फोटोसह जे प्रसारण आणि चर्चा सुरू आहे. त्यावरून सदर प्रकरणात जिल्ह्यातील एका मोठ्या राजकीय व्यक्तीचा नक्कीच सहभाग असावा. अशी राजकीय क्षेञात वावरणा-या हजारो नागरीकांची शंका असुन पोलीस प्रशासनाने वेगवेगळ्या प्रसार माध्यमा मधुन प्रसारीत होत असलेल्या बातम्या आणि फोटोची चौकशी करावी. पोलीस प्रशासनाने असे केल्यास आरोपींचा बोलविता धनी पडद्या समोर आल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार आणि काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर आदी उपस्थित होते.
आमचे नेते संतोषसिंह रावत यांचेवर गोळीबार करणाऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले.,ही बाब अभिनंदनीय आहे.,पण कसुन तपास करून घटनेतील सुञधारास लवकरात लवकर पकडावे. अन्यथा तिव्र आंदोलन करू
राकेश रत्नावार
सभापती. कृ.उ.बा.स.मूल