संतोषसिंह रावत यांचेवर गोळीबार करणाऱ्या यादव बंधुना सोमवार पर्यंत पोलीस कोठडी

84

मूल : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा काँग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचेवर ११ मे २०२३ रोजी रात्रो ९.१९ वाजता गोळीबार केल्याच्या कारणावरून पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या राजविर यादव आणि त्याचा लहान भाऊ अमर यादव यांना मूल येथील न्यायालय रजेवर असल्याने आज चंद्रपूर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही सोमवार २९ तारखेपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली. पोलीस कोठडीच्या पाच दिवसाच्या काळात तपासी अधिकाऱ्यांना वाहन चालक, वापरण्यात आलेले वाहन आणि हत्यार याशिवाय अन्य बाबींचा उलगडा करायचा आहे. यात पोलीसांना कितपत यश येते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here