संतोषसिंह रावत यांचेवरील पैसे घेतल्याचा आरोप निराधार, सखोल चौकशी करून सुञधारास अटक करा, शिष्टमंडळाची मागणी

80

मूल : गोळीबार प्रकरणातील आरोपींनी दिलेल्या आर्थिक व्यवहाराच्या बयाणाची उच्च स्तरीय चौकशी करून आरोपींचा बोलविता धनी कोण ? याची सत्यता उजेडात आणावी. अशी मागणी तालुक्यातील विविध संघटनानी जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे कडे केली आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा काॅंग्रेस नेते संतोषसिंह रावत यांचेवर ११ मे रोजी रात्रो ९.१९ वाजता गोळीबार झाला. गोळीबारात संतोष रावत सुरक्षीत राहील्यानंतर गोळीबार करणा-यांचा चंद्रपूर पोलीसांनी युध्दपातळीवर तपास केला. तपासाअंती चंद्रपूर पोलीसांनी उत्तर भारतीय काॅंग्रेस सेलचा जिल्हाध्यक्ष राजविर यादव आणि त्याच्या लहान भावास ताब्यात घेतले. पोलीसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींनी वेकोली मध्यें नोकरी लावून देतो म्हणून घेतलेले 6 लाख रूपये परत देत नसल्याने रावत यांचेवर गोळी चालविल्याचे बयाणात सांगीतले. परंतू आरोपींनी दिलेले कारण हे अनुभवावरून वास्तविक नसून निराधार आणि बनवाबनवीचा प्रकार आहे. त्यामूळे रावत यांचेवर गोळी चालविण्याचे कारण वेगळे असून आरोपींनी कोणाच्या तरी सांगण्यावरून गोळी चालविली. अशी शंका आहे. म्हणुन आरोपींनी दिलेल्या पैसे दिल्याच्या बयाणाची उच्च स्तरीय यंत्रणे मार्फत चौकशी करण्यांत येवुन वास्तविक परिस्थिती पोलीस प्रशासनाने समाजासमोर आणावी. अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, संचालक घनश्याम येनुरकर, सुमीत आरेकर, आदर्श खरेदी विक्री सहकारी संस्थेचे अध्यक्ष पुरूषोत्तम भुरसे, संचालक विवेक मुत्यलवार, काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरू गुरनूले, शहर अध्यक्ष सुनिल शेरकी, युवक काॅंग्रेसचे पवन निलमवार, सामाजीक कार्यकर्ते राजु मारकवार, पत्रकार मंगेश पोटवार, भोजराज गोवर्धन, दुर्गा मंदिर सेवा समितीचे सचिव संजय पडोळे, केदारनाथ कोटगले आदिंनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी घडलेल्या गोळीबारा नंतर तपास कामी आवश्यक असलेले सबळ पुरावे उपलब्ध नसतांना युक्ती आणि चातुर्याने पोलीसांनी आरोपींचा शोध लावला. ही बाब कौतुकास्पद असल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, तपास अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुशील नायक, स्थानिय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार आदिंचा पुष्पगुच्छा देवून शिष्टमंडळाने अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here