पक्षातील पदाधिकाऱ्यांनी पक्ष संस्कृती जपावी : आमदार सुभाष धोटे

67

मूल : पक्ष देशाच्या स्वातंत्र्य लढाईत अग्रस्थानी असलेला व देशाच्या जळणवळणीत अनमोल योगदान देणारा, लोकशाही कार्यसंस्कृती मानणारा पक्ष आहे. या पक्षाची संस्कृती ही सभ्य व अहिंसावादी राहिली आहे. या विपरीत वागून पक्षांतर्गत शांतता व शिस्त भंग करण्याचे काम कोणीही करू नये. जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या गोळीबार प्रकरणात सर्वांनी संवेदनशील वागले पाहिजे. हा हल्ला पक्षातीलच एका ज्येष्ठ पदाधिकारी, जि. प. चे माजी अध्यक्ष व पक्षाचे वर्चस्व असलेल्या स्थानिक जिल्हा बँकेच्या अध्यक्षावर झाला आहे याचे गांभीर्य ओळखून पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांनी पक्षातच घरचा आहेर देवू नये व स्वतःची तथा पक्षाची संस्कृती घालवू नये, असा खणखणीत इशारा राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी दिला आहे.

नुकतेच काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी गोळीबार घटनेचे गांभीर्य नसलेले तकलादू व आकसपूर्ण वक्तव्य केले. आरोपीला व त्याच्या दिशाभूल करणाऱ्या बयाणाला समर्थन करणारे वक्तव्य श्री रामू तिवारी यांच्याकडून आले. त्यांनी जिल्हा बँकेच्या सर्व संचालक मंडळाची नार्को टेस्ट व्हावी, अशी मागणी केली. त्यांची मागणी ही पक्षाच्याच लोकांवर शंका घेणारी ठरली आहे. आधी त्यांनी पक्षातील एक पदाधिकारी आरोपी निघतो, याचे चिंतन करायला हवे होते. आरोपीचे पक्षातील पद काढून, त्याच्या कृत्याचा जाहीर निषेध करून, त्याची नाकों टेस्टची मागणी करायला पाहिजे. असे न करता थेट पक्षाचे वर्चस्व असलेल्या जिल्हा बँकेतील संचालकांनाच दोषी ठरविणारी मागणी करणे म्हणजे पक्षाला घराचा आहेर देणे होय. विषयाच्या गांभीर्याला बगल देण्यासाठी केलेली ही मागणी त्यांचा आरोपीला समर्थन असल्याचा पुरावा दर्शवितो. आणि जिल्हात काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी परिश्रम घेणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ९० % काँग्रेस विचारधारेच्या संचालकांवर अविश्वास व्यक्त करते. जिल्हा मध्यवर्ती बँकेची नोकर भरती ही शासकीय निकषानुसार राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली अतिशय पारदर्शकपणे होते. त्यात बँकेच्या संचालकांचा कोणताही हस्तक्षेप चालत नाही हे सुध्दा त्यांना माहीत असायला हवे होते.
स्वतः रामू तिवारी हे इतर पक्षातून काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यांना पक्षाची शिस्त व संस्कृती माहित नाही. आधीच देशात पक्ष एका कठीण काळातून जात असताना पक्षातील पदाधिकारी असे वक्तव्य व कृत्य करीत असेल तर अशा पक्षविरोधी पदाधिकाऱ्यांना पक्षात ठेवायचे की नाही याचा विचार पक्षाला करावा लागेल, असा गर्भित इशारा देखील आमदार धोटे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here