विद्युत खांब घेवुन जाणारा ट्र्ँक्टर पलटी झाल्याने दोघांचा मृत्यु, एक जखमी

69

मूल : सिमेंट विद्युत खांब घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झाल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील पिपरी दिक्षित जवळ घडली.

तालुक्यातील केळझर येथील शशीकर कुमरे यांच्या मालकीच्या ट्र्ँक्टर (क्र. MH-34-AP-1306) ने पिपरी दिक्षित येथुन भंजाळी कडे सहा सिमेंटचे विद्युत खांब नेत असताना सकाळी १०.३० ते ११ वा. चे दरम्यान पिपरी दिक्षित पासुन २ कि.मी.अंतरावर ट्र्ँक्टरची ट्राली पलटी झाली. त्यामुळे ट्राली मध्ये बसलेल्या तीन जणांपैकी दोघांच्या अंगावर सिमेंटचे विद्युत खांब पडल्याने मिथुन पांडुरंग मडावी आणि अंकुश राजु गंधश्रीवार यांचा घटनास्थळीच मृत्यु झाला तर ईश्वर मांडवकर जखमी झाला. अपघातग्रस्त ट्र्ँक्टरच्या पाठीमागेहुन येत असलेले सुपरवायझर सुभाष रणदिवे यांना अपघाताचे दृष्य बघुन न झाल्याने ते घटनास्थळी बेशुध्द झाले. चामोर्शी येथील विद्युत कंञाटदार दुधबळे यांच्या कामावर मृतक आणि जखमी मजुर म्हणुन कामावर होते. घटनेतील मृतक आणि जखमी हे मूल तालुक्यातील केळझर येथील रहिवासी असुन विवाहीत आहेत. अपघातात दोघांचा मृत्यु झाल्याने त्यांचे कुटूंब उघड्यावर पडले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशन मूल येथील पोउनि डोंगरे सहका-यासह घटनास्थळी पोहोचले. नागरीकांच्या सहकार्याने ट्रॅक्टर खाली दबलेल्या दोघांनाही बाहेर काढुन त्यांचे पार्थीव विच्छेदना करीता उपजिल्हा रूग्णालय मूल येथे आणि एका जखमींना चंद्रपूर येथील सामान्य रूग्णालयात रवाना केले. पोलीसांनी ट्र्ँक्टर चालक आशिष निकोडे विरूध्द गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास मूल पोलीस करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here