काँग्रेसच्या विसर्जनाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवुन कामाल लागा, वीर सावरकर गौरव याञेत ना. मुनगंटीवार यांचे आवाहन

77

मूल : देशाच्या स्वातंत्र्यासाठी वीर सावरकरांनी केलेल्या त्यागाचा आदर न करता काँग्रेस त्यांचेसह देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या सर्वधर्मीय महामानवांचा अपमान करते. अश्या देशविरोधी काँग्रेसच्या विसर्जनाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवुन आता कामाला लागा. असे आवाहन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव याञे निमित्त स्थानिक गांधी चौकात आयोजित सभेत ना. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, माजी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जि.प.च्या माजी अध्यक्षा संध्या गुरनुले, माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, पं.स.चे माजी सभापती चंदु मारगोनवार, न.प.चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, भाजपा युवती जिल्हाध्यक्ष अल्का आञाम, प्रशांत समर्थ, चंद्रकांत आष्टणकर आदींच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभेत बोलतांना ना. मुनगंटीवार यांनी दाढी वाढवुन पंतप्रधान होता येत नाही तर मेंदु आणि विचारांचा विकासा सोबतच राष्ट्रभावना रूजवावी लागते. असे मत व्यक्त केले. ज्यांच्या इशा-यावर देशात क्रांतीची मशाल पेटली ते सावरकर हजार वर्षे जन्म घेवुनही विदेशात नांव बदलवणा-या राहुल गांधीना होता येणार नाही असे सांगतांना ना. मुनगंटीवार यांनी देशात जाती जाती, धर्मा धर्मात वाद निर्माण करणाऱ्या काँग्रेसला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. असे मत व्यक्त केले. विधानसभा क्षेञाचा आमदार म्हणुन काम करतांना क्षेञाचा भरभरून विकास केला आहे. गांवागांवात विकासाच्या अनेक योजना पोहोचविल्या आहेत, असे असतांना काँग्रेसची काही मंडळी विकास कामात राजकारण करून आडकाठी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत असा आरोप करतांना ना. मुनगंटीवार यांनी विकासाच्या आड येणाऱ्या प्रत्येकाला धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही. असा सज्जड दमही दिला. राजकारण करायचे तर विकासाचे करा, सेवा आणि मदतीचे करा. निरर्थक आरोप करून लोकशाहीचे हरण करू नका असा सल्लाही ना. सुधीर मुनगंटीवार यांनी बोलतांना दिला.
सभेपुर्वी स्थानिक चंद्रपूर मार्गावरील इको पाँर्क समोरून गौरव याञा काढण्यात आली. याञेत क्षेञातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे आजी माजी सदस्य, भाजपा पदिधिकारी यांचेसह आबाल स्ञी पुरूष मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. याञेचा समारोप स्थानिक गांधी चौकात सभेव्दारा करण्यात आला. सभेपुर्वी ना. मुनगंटीवार यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला आणि वीर सावरकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. प्रविण मोहुर्ले यांनी संचलन आणि शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here