योग नृत्य परीवारात पार पडला महीलांचा बचत गट मेळावा

70

मूल : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मूल शाखेच्या वतीने स्थानिक दुर्गा मंदीर येथील योग नृत्य परीवारातील महीलांचा बचत गट मार्गदर्शन मेळावा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे मार्गदर्शनात संपन्न झाला. शाखा व्यवस्थापक मधुकर लेनगुरे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते केदारनाथ कोटगले यांचेसह गट सल्लागार अशोक पवार आणि शंकर लोंढे मार्गदर्शक म्हणुन उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शक अशोक यांनी बचत गटाच्या निर्मिती पासुन महीलांच्या जीवनात बचत गटाची आवश्यकता आणि योगदान या विषयावर तर मार्गदर्शक शंकर लोंढे यांनी बचत गटाच्या माध्यमातुन करावयाची कार्यपध्दती, बचत गटाचे फायदे आणि उभारावयाचे उद्योग या विषयावार मार्गदर्शन केले. शाखा व्यवस्थापक मधुकर लेनगुरे यांनी बचत गटाच्या निर्मिती मध्ये बँकेच्या सहकार्याच्या धोरणावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन श्यामलता बेलसरे यांनी तर वैशाली काळे यांनी आभार मानले. राष्ट्रगिताने मेळाव्याची सांगता झाली. मेळाव्याला योग नृत्य परीवारातील महीला व पुरूष मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या. स्थानिक दुर्गा मंदीर येथील योग नृत्य परीवारातील महीलांचा बचत गट मार्गदर्शन मेळावा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे मार्गदर्शनात संपन्न झाला. शाखा व्यवस्थापक मधुकर लेनगुरे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते केदारनाथ कोटगले यांचेसह गट सल्लागार अशोक पवार आणि शंकर लोंढे मार्गदर्शक म्हणुन उपस्थित होते. यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शक अशोक यांनी बचत गटाच्या निर्मिती पासुन महीलांच्या जीवनात बचत गटाची आवश्यकता आणि योगदान या विषयावर तर मार्गदर्शक शंकर लोंढे यांनी बचत गटाच्या माध्यमातुन करावयाची कार्यपध्दती, बचत गटाचे फायदे आणि उभारावयाचे उद्योग या विषयावार मार्गदर्शन केले. शाखा व्यवस्थापक मधुकर लेनगुरे यांनी बचत गटाच्या निर्मिती मध्ये बँकेच्या सहकार्याच्या धोरणावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन श्यामलता बेलसरे यांनी तर वैशाली काळे यांनी आभार मानले. राष्ट्रगिताने मेळाव्याची सांगता झाली. मेळाव्याला योग नृत्य परीवारातील महीला व पुरूष मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here