गळफास लावुन युवकाने जीवन संपविले

65

मूल : स्थानिक रामपुर परीसरातील युवक राकेश गुज्जनवार (२९) याने जानाळा ते आगडी दरम्यान चिचपल्ली वनपरीक्षेञ नियतकक्ष जानाळ येथील कक्ष क्र. ७१४ मध्ये महामार्गापासुन अवघ्या ५० मिटर अंतरावर जंगलात झाडाला गळफास लावुन जीवन संपविल्याची घटना आज संध्याकाळी उघडकीस आली. वृत्त लिहेस्तोवर आत्महत्येचे समजले नाही. मृतक युवक मूल रामपुर येथील रहीवाशी असला तरी मागील काही महीण्यांपासुन बांधकाम कामगार म्हणुन तो चंद्रपूर येथे राहत होता. कौटुंबिक वादामधुन राकेशने जीवन संपविले असावे. अशी चर्चा आहे. मृतक राकेश अविवाहीत आहे. सदर घटनेची पोलीसांनी नोंद केली असुन ठाणेदार सुमीत परतेकी यांचे मार्गदर्शनात पुढील तापास पोहेकाँ पठाण करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here