मूल – स्वच्छ व सुंदर शहर ठेवल्याने शासनाकडून विविध पुरस्कार प्राप्त होवुन नावारूपास आलेल्या मूल शहराकडे सध्यास्थितीत शहराच्या स्वच्छतेकडे कोणीही माजी पदाधिकारी यांचे व प्रशासनाचे लक्ष नसल्याने शहरात गावठी डुकरांचा हैदोस वाढल्याने शहर स्वच्छतेचे तीन तेरा वाजल्याचे मत नागरिकांनी बोलून दाखविले आहे. काही दिवसापूर्वी नगर परिषदेच्या वतीने डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी फतवा काढण्यात आला होता. डुकरे पकडण्याची मोहिमही राबविण्यात आली. परंतु मागील एक वर्षाचा कालावधी संपत आला तरी देखील डुकराचा बंदोबस्त करण्यात आला नसल्याने शहरामध्ये डुकराच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. येत्या पंधरा दिवसाचे आत हैदोस माजविणाऱ्या गावठी डुकर मालकाने आपल्या डुकरांचा बंदोबस्त करावा. अन्यथा त्यांचेविरूध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र या फतव्याचे काटेकोर पणे पालन केल्या जात नसल्याचे येथील नागरिकांचे मत आहे.अजूनही शहरात मोठ्या प्रमाणात कळपाने डुकरे सर्वञ वावरतांना दिसतात. मुख्य रस्त्यानेही फिरकताणा दिसतात. मुख्य रस्ता क्रॉस करतांना सुद्धा मोटार सायकल चे अपघात होत आहेत व याआधीही काही मोटार सायकलचे अपघातही झाले आहे. जिल्हा परिषद व खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान भोजन, खीचळी दिल्या जाते अशा शालेय परिसरात डुकरांचा कळप सततचा त्रासदायक झाल्याचेही सांगण्यात येत आहे. नगर परिषदेने याकडे गांभीर्याने लक्ष घालून शहरात सर्वत्र होणाऱ्या डुकराच्या त्रासाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी येथील नागरिकांची मागणी आहे.