सावली : स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील भौतीकशास्त्र विभागाच्या वतीने तालुक्यातील खेडी येथे रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आला. खेडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात संपन्न झालेल्या अभियानाची सुरूवात भौतीकशास्त्र विभाग प्रमुख डाॅ. प्रेरणा मोडक यांचे हस्ते झाली. यावेळी महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. संदीप देशमुख आणि प्रा. आशिष शेंडे उपस्थित होते. अभियाना दरम्यान उपस्थित विद्यार्थ्यांसोबतचं ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना डाॅ. प्रेरणा मोडक आणि प्रा. संदीप देशमुख यांनी घडत असलेल्या अपघातां विषयी मार्गदर्शन केले. राज्य आणि महामार्गावर पुरेश्या प्रमाणांत रेडीयम आणि रेडीयम फलकाचा वापर केल्या जातो परंतू राज्यातील जिल्हा आणि ग्रामीण भागातील अनेक मार्गावर रेडीयमचा वापर केल्या जात नाही, त्यामूळे वाहणावरील नियंत्रण सुटून रात्रोच्या वेळेस सदर मार्गावर मोठया प्रमाणांत अपघात घडत आहेत. यामूळे मोठया प्रमाणांत वित्त सोबतचं जीव हानीही होत आहे. याशिवाय ग्रामीण भागात वापरली जाणारी सायकल, बैलगाडी, ट्रॅक्टरची ट्राली यांनाही रेडीयमयुक्त रिप्लेक्टर वापरल्या जात नाही, रात्रोच्या वेळेस गावांमधून जाणा-या अनेक मार्गावर गाय, बैल, म्हैस बसून असतात. त्यामूळे अनेकदा वाहणचालकांना रस्त्यावर बसलेले जनावर दिसत नाही, याही कारणामूळे अपघात घडतांना दिसत आहे. यासर्व बाबींचा विचार करता मार्गावर महत्वाच्या आणि आवश्यक ठिकाणी रेडीयम व रेडीयम फलक लावण्यांत आल्यास घडत असलेले अपघात नक्कीच कमी झाल्याशिवाय राहणार नाही. असा विश्वास व्यक्त करतांना संबंधीत विभागाने याकडे लक्ष द्यावे. अशी विनंती मार्गदर्शक प्राध्यापक डाँ. प्रेरणा मोडक, प्रा. संदीप देशमुख आणि प्रा. आशिष शेडे यांनी केली. यावेळी उपस्थित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गावांतील सायकल, बैलगाडी, ट्र्ँक्टर ट्राली, मोटार सायकल, जनावरांचे सिंगाना दर्शनी व दिसेल अश्या भागावर रेडीयम चिकटवले. अन्य ग्रामस्थांनीही त्यांच्या मालकीच्या जनावरांच्या सिंगाना व वाहणांना रेडीयम लावावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचलन प्रा. आशिष शेंन्डे यांनी केले. अभियान यशस्वी करण्यासाठी भौतीकशास्ञ विषयाच्या विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.