समोरा समोर झालेल्या वाहणाच्या अपघातात युवकाचा मृत्यु

96

मूल : मूल चंद्रपूर मार्गावरील महादवाडी समोरील वळण मार्गावर दोन वाहणांची समोरा समोर धडक झाल्याने कार चालक युवकाचा मृत्यु झाल्याची घटना आज पहाटे घडली.

गडचिरोली जिल्ह्यातील वडसा (देसाईगंज) येथील रहीवाशी पवन अनिल परसवानी (२२) हा आज पहाटे ५ वा. चे सुमारास चंद्रपूर वरून मूल मार्गे स्वमालकीची टाटा नेक्सान क्र. एमएच ३३ व्ही १९१४ ने एकटाच वडसा कडे जाण्यास निघाला. दरम्यान ५.३० वा. दरम्यान मूल वरून चंद्रपूर कडे निघालेला ट्रक क्र. एमएच ०४ ईएल ७१०० ची महादवाडी समोरील वळण मार्गावर समोरा समोरा धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की धडकेत टाटा नेक्सनचा समोरील भाग चकनाचुर होवुन चालक पवन अनिल परसवानी (२२) याचा घटनास्थळी मृत्यु झाला. घटनेची माहीती होताच मूल पोलीसांनी घटनास्थळ गाठुन गाडीत सापडुन मृत्यु पावलेल्या पवन परसवानी याचे पार्थीव काढुन शवविच्छेदना करीता उपजिल्हा रूग्णालय मूल येथे पाठविले. पोलीसांनी ट्रक चालक पांडुरंग काळे विरूध्द गुन्हा दाखल करून अटक केली. मृतक पवन परसवानी हा वडसा येथील आरमोरी मार्गावरील पेट्रोल पंप चालक अनिल परसवानी यांचा एकुलता एक मुलगा होता. प्रकृती तपासण्यासाठी म्हणुन कालच तो चंद्रपूर येथे गेला होता. रात्री उशीर झाल्याने त्याने मोठ्या बहीणीकडे मुक्काम केला. सकाळी पेट्रोल पंप सुरू करण्याच्या घाईने तो चंद्रपूर येथुन वडसा कडे निघाला होता. परंतु नियतीने त्याला वडसा येथे पोहोचण्या पुर्वीच डाव साधला. त्याचे पश्चात आई वडील दोन विवाहीत बहीणी शिवाय मोठा परीवार आहे. मनमिळावु आणि सुस्वभावी पवनच्या अपघाती मृत्युमूळे वडसा येथील आप्तपरीवारात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here