प्रलंबीत मागण्यांच्या पुर्ततेसाठी पुकारलेला एक दिवसीय लाक्षणिक संप यशस्वी, गोंडवाना विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी घडविले एकतेचे दर्शन

85

मूल : शासन दरबारी प्रलंबीत असलेल्या अकृषी विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक कृती समितीने पुकारलेल्या आजच्या एक दिवसीय लाक्षणिक संपात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील कर्मचा-यांसह चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हयातील सर्वच वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी कळकळीत संप पाळुन कर्मचारी एकतेचे दर्शन घडवून दिले. सेवातंर्गत सुधारित आश्वासीत प्रगती योजनेचे रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जिवीत करून अंमलबजावणी करणे, सातवा वेतन आयोगातील तरतुदीनुसार 10, 20, 30 वर्षानंतरच्या लाभाची योजना लागु करणे, सातव्या वेतन आयोगाच्या लाभापासून वंचित असलेल्या राज्यभरातील 1410 विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचा-यांना थकबाकीसह सातवा वेतन आयोग लागु करावा, विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचा-यांवरील वाढत्या कामाचा ताण कमी करण्यासाठी रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता देण्यात यावी, 2005 नंतर सेवेत रूजू झालेल्या कर्मचा-यांना जुनी पेंशन योजना लागु करावी, विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचा-यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहीत धरून त्या आधारे सातव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागु करावी आदि मागण्यांच्या पुर्ततेसाठी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हातील वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी जिल्हाध्यक्ष प्रशांत रंदई, महासचिव अरूण जुनघरे, कार्याध्यक्ष लोमेश दरडे उपाध्यक्षस राजेश्वर कायरकर, कोषाध्यक्ष शशीकांत माडे, सल्लागार राममोहन ब्राडीया, महासंघ प्रतिनिधी गजानन काळे यांचे तर गोंडवाना विद्यापीठात कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मनोज जाधव, उपाध्यक्ष निलेश काळे, सचिव सतिश पडोळे, महादेव वासेकर, शाम कळस्कर, सुचिता मोरे, विपीन राउत यांचे नेतृत्वात आज कार्यालयीन कामकाज कळकळीत बंद पाडले. येत्या दोन दिवसात शासनाने कर्मचा-यांच्या प्रलंबीत मागण्यांची पुर्तता करण्याचे लेखी आदेश न काढल्यास येत्या 20 फेबु्वारी पासून बेमुदत बंद पाळल्या जाईल. असा इशारा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here