शिक्षक मतदारांच्या विश्वासाला तडा पोहोचविणार नाही, नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले यांनी दिला विश्वास

77

मूल : भाजपासाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या नागपुर विभाग शिक्षक मतदार संघातून ज्या विश्वासाने मतदारांनी मला विधान परिषदेत प्रतिनिधी म्हणून पाठविले त्या शिक्षक मतदारांच्या विश्वासाला तडा पोहोचू न देता जुन्या पेंशनच्या मुद्दयासह प्रलंबीत मागण्यांच्या पुर्ततेसाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत राहीन, अशी ग्वाही देत निर्वाचित आमदार सुधाकर अडबाले यांनी मतदारांचे आभार मानले.

स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ मूलच्या वतीने आयोजीत कर्मवीर महाविद्यालय येथे पार पडलेल्या सत्कार समारंभात आ. सुधाकर अडबाले बोलत होते. संस्थाध्यक्ष अँड.बाबासाहेब वासाडे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी खासदार सुरेश उर्फ बाळुभाऊ धानोरकर, संस्थेचे सचिव अँड. अनिल वैरागडे, विजुक्टाचे अध्यक्ष खाडे, प्राचार्य डाॅ. अनिता वाळके उपस्थित होते. तालुक्यातील विविध शैक्षणीक संस्था आणि राजकिय पक्षाच्या वतीने नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले यांचा सत्कार झाल्यानंतर शिक्षण प्रसारक मंडळ मूलच्या वतने आ. सुधाकर अडबाले आणि खा. बाळुभाऊ धानोरकर यांचा संस्थाध्यक्ष अँड. बाबासाहेब वासाडे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव अँड.अनिल वैरागडे यांनी केले. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करतांना नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले यांचे कडून अनेक अपेक्षा व्यक्त केल्या. महाविकास आघाडी कडून अडबाले यांची उमेदवारी निश्चित होताच त्यांचा विजय निश्चित होईल. असा विश्वास जिल्हयातीलचं नव्हे तर विदर्भातील महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकत्र्यांना होता, असे मत खा. बाळुभाऊ धानोरकर यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना अँड. बासाहेब वासाडे यांनी शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेल्या अनेक समस्या सोबतचं शिक्षकांच्या न्याय मागण्यांकडे आ. सुधाकर अडबाले आणि आ. अभिजीत वंजारी प्रयत्नशील राहतील. असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचलन प्रा.डाॅ. गणेश आगलावे यांनी तर आभार विमाशीचे पदाधिकारी गुरूदास चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाला काॅंग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरूदास गुरनूले, महिला अध्यक्षा रूपाली संतोषवार, राष्ट्रवादीचे विधानसभाध्यक्ष सुमीत समर्थ, काॅंग्रेसचे शहर अध्यक्ष सुनिल शेरकी, राकाॅंपाचे तालुकाध्यक्ष प्रा. किसन वासाडे यांचेसह महाविकास आघाडीच्या पदाधिका-यांसह शिक्षक मतदार मोठया संख्येनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here