मूल : पोलीस स्टेशन मूल येथे नव्यानेच रूजु झालेले ठाणेदार पो.नि.सुमित परतेकी यांचे व्हाॕईस ऑफ मीडिया मूलच्या वतीने पेढा भरवुन आणि पुष्पगुच्छ देवुन स्वागत व पुढील वाटचाली करीता शुभेच्छा देण्यात आल्या, यावेळी व्हाईस ऑफ मीडिया चे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, तालुका अध्यक्ष मंगेश पोटवार, जिल्हा कार्याध्यक्ष गुरू गुरनुले, प्रसिध्दी प्रमुख भोजराज गोवार्धन, संघटक विनायक रेकलवार, युवराज चावरे, तालुका कार्याध्यक्ष शशीकांत गणवीर, सचिव दुर्वास घोंगळे आदी उपस्थित होते, नागपूर शहर पोलीस विभागाच्या गुन्हे शाखेत कार्यरत राहीलेले ठाणेदार सुमीत परतेकी यांनी अमरावती जिल्ह्यातही सेवा केली आहे. मुळचे नागपूर निवासी असलेले ठाणेदार सुमीत परतेकी यांनी नागपूर शहराच्या गुन्हे शाखेत सेवा केली असल्याने त्यांना गुन्ह्याचे स्वरूप, घडण्याची पध्दत आणि गुन्हेगारांचा चांगला अभ्यास आहे. वर्षभरापासुन चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे वाचक फौजदार म्हणुन जबाबदारी सांभाळतांना मूल तालुक्याचा अभ्यास केला आहे. त्यामूळे मूल तालुक्यातील विविध गुन्हे आणि अवैद्य व्यवसायावर सहकारी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नक्कीच नियंत्रण आणणार. असा विश्वास बोलुन दाखवितांना दोन दिवसाच्या अल्पकाळात मूल शहर शांत आणि सहकार्याची भुमीका ठेवणारे असल्याचे आवर्जुन सांगीतले. व्हाईस ऑफ मीडिया च्या पदाधिकाऱ्यांनीही पोलीस आणि पत्रकार यांच्यात समन्वय निर्माण करून तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन उपस्थित पञकारांनी दिले.