73

मूल : प्रवाश्यांच्या सेवेसाठी ब्राॅडगेज मध्यें रूपांतरीत करण्यांत आलेल्या चांदाफोर्ट गोदिया रेल्वे मार्गाने अलीकडे मोठया प्रमाणांत मालवाहु रेल्वे सेवा सुरू केल्याने जनतेच्या कामाला महत्व न देता मालवाहु रेल्वे गाडयांना जाण्याकरीता प्रवासी गाडया तासनतास थांबविल्या जात आहे. त्यामूळे प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

आरामदायी, कमी दराची आणि सोयीची प्रवास सेवा देणा-या रेल्वे प्रशासनाने जनतेची मागणी आणि गरज लक्षात घेवून चांदाफोर्ट ते गोंदीया पर्यंत धावणा-या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्राॅडगेज मध्यें रूपांतर केले. रेल्वे मार्गाचे ब्राॅडगेज मध्यें रूपांतर झाल्यानंतर जनतेला जलद, कमी खर्चाची आणि आरामदायी प्रवासाची उत्तम सेवा मिळत असल्याने जनताही रेल्वे प्रवासाला प्राधान्य देत आहे. यामूळे मूल मार्गे धावणा-या ब्राॅडगेज रेल्वेने प्रवास करणा-यांची संख्या मोठया प्रमाणांत वाढत असून बसण्याकरीता आता रेल्वे डब्ब्यात जागाही मिळणे कठीण जात आहे. पर्यायाने मूल मार्गे चांदाफोर्ट ते गोंदिया अप अँण्ड डाऊन धावणारी प्रवासी रेल्वे सेवा रेल्वे प्रशासनाला फायदयाची ठरत आहे. त्यामूळे रेल्वे प्रशासनाने ज्या उद्देशासाठी मूल मार्गे ब्राॅडगेज प्रवासी रेल्वे सेवा सुरू केली त्या उद्देशाकडे दुर्लक्ष न करता जनतेला प्रवासाची उत्तम सेवा देणे अपेक्षीत आहे. परंतू असे न करता मागील काही महिण्यांपासून रेल्वे प्रशासनाने प्रवासी जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार चालविला असल्याचे दिसून येत आहे. मूल मार्गे चांदाफोर्ट-गोंदिया ब्राॅडगेज रेल्वे सेवा सुरू होण्यापूर्वी उत्तरेकडून दक्षिणकडे ये-जा करणा-या प्रवासी व मालवाहतुकीच्या संपुर्ण रेल्वे गाडया नागपूर मार्गे धावत होत्या. अलीकडे मात्र चांदाफोर्ट-गोंदिया ये-जा करण्यासाठी मूल मार्गे कमी अंतराची ब्राॅडगेज रेल्वे सेवा सुरू झाल्याने रेल्वे प्रशासन उत्तरेकडून दक्षिणकडे आणि दक्षिणकडून उत्तरेकडे माल वाहतुक करण्यासाठी मूल-नागभिड-वडसा ब्राॅडगेज रेल्वे मार्गाला प्राधान्य देत आहे. मूल नागभिड वडसा मार्गाने मालवाहतुक रेल्वे सेवा मोठया प्रमाणांत सुरू केल्याने प्रवासी रेल्वे सेवेत मोठया प्रमाणांत व्यत्यय येत आहे. मूल नागभिड वडसा मार्गाने माल वाहतुक रेल्वे वळविल्या जात असल्याने माल वाहतुक रेल्वेला पुढे जावू देण्यासाठी वारंवार प्रवासी रेल्वे गाडयांना कोणत्याही रेल्वे स्टेशनवर तासनतास थांबवून ठेवल्या जात आहे. मालवाहु रेल्वे गाडीला पुढे जाण्यासाठी प्रवासी गाडी वारंवार थांबविल्या जात असल्याने निर्धारीत वेळेत पोहोचणारी प्रवासी गाडी निर्धारीत वेळेपेक्षा कितीतरी तास उशीराने पोहोचत असल्याने जनतेच्या पुर्वनियोजीत कामात आडकाठी येत आहे. यामूळे प्रवासी जनता हवालदिल झाली असून कामाचे नियोजन करून रेल्वेने प्रवासासाठी निघाले असतांना रेल्वे प्रशासनाच्या रेल्वे थांबवून ठेवण्याच्या धोरणामूळे कामाच्या नियोजनात विस्कळीतपणा येत असून याचा जनतेला मोठया प्रमाणांत त्रास होत आहे. प्रवासी जनतेच्या सोयीसाठी सुरू केलेली ब्राॅडगेज रेल्वे सेवा रेल्वे प्रशासनाच्या कमाईच्या धोरणामूळे आता डोकेदुखी ठरत असून केंद्र शासनाने मूल नागभिड वडसा मार्गेे सुरू केलेली ब्राॅडगेज रेल्वे सेवा जनतेसाठी कि धनधांडग्याच्या उद्योगासाठी असा प्रश्न केल्या जात आहे.

चांदाफोर्ट रेल्वे स्टेशन येथून 10.15 वाजता सुटणारी चांदाफोर्ट गोंदिया प्रवासी रेल्वे मूल येथे सकाळी 11 वाजता पोहोचणे अपेक्षीत होते. परंतू एकापाठोपाठ एक अश्या दोन मालवाहु रेल्वे गाडयांना पुढे जाणे सोयीचे व्हावे म्हणून चांदाफोर्ट गोंदिया प्रवासी रेल्वे गाडी केळझर रेल्वे स्टेशनवर तब्बल दोन तास थांबवून ठेवण्यात आले. त्यामूळे मूल येथे सकाळी 11 वाजता पोहोचणारी चांदाफोर्ट गोंदिया प्रवासी रेल्वे आज तब्बल पाऊणे तीस तास उशीरा पोहोचली. यामूळे सदर गाडीने प्रवास करणा-या शेकडो नागरीकांना त्रास झाला असून मूल पासून पुढे प्रवास करणा-या प्रवाश्यांच्या कामाचे नियोजन बिघडल्याने अनेकांना प्रवास न करताच घरी परतावे लागले. ही बाब गंभीर आणि प्रवाश्यांच्या भावनांशी खेळ करणारी आहे. त्यामूळे रेल्वे प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष दयावे. अन्यथा रेल्वे प्रशासनाच्या या मनमानी कारभारा विरूध्द काँग्रेस पक्षाच्या वतीने रेल रोको आंदोलन करू.
संतोषसिंह रावत,
अध्यक्ष, जि.म.स.बॅंक चंद्रपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here