मोकाट कुञ्यांच्या हल्यात आठ वर्षीय मुलगा गंभीर जखमी

97

मूल : शौचविधी आटोपुन घराकडे परत येत असताना मोकाट कुञ्यांनी हल्ला केल्याने आठ वर्षीय बालक गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील फिस्कुटी येथे घडली. जखमी बालक सध्या नागपूर येथील सुपर स्पेशालीटी दवाखान्यात उपचार घेत आहे. फिस्कुटी येथील शेतमजुर किशोर चौधरी यांची दोन मूल सिध्दार्थ (८ वर्षे) आणि शौर्य (५) हे शनिवारी संध्याकाळी ६.३० वा. सुमारास घरालगतच्या शेतात शौचा करीता गेले होते. शौच विधी आटोपुन दोन्ही भाऊ घरी परत येत असतांना गांवातील सात आठ मोकाट कुञ्यांनी सिध्दार्थ आणि शौर्य यांचेवर हल्ला केला. अचानक कुञ्यांनी हल्ला केल्याने मोठा भाऊ सिध्दार्थ जमीनीवर पडला तर लहान शौर्य कुञ्यांपासुन कशीबशी सुटका करत घराकडे धावत आला. सिध्दार्थ जमीनीवर पडल्याने मोकाट कुञ्यांनी त्याच्या हात, पाय, पोटासह मानेला चावा घेतला. दरम्यान शेताकडुन परत येत असलेल्या सुनिता ठाकुर हीने हिंम्मत करत कुञ्यांच्या हल्यामधुन जखमी सिध्दार्थला सोडविले. घटनास्थळा समोरच जखमी सिध्दार्थचे घर असल्याने सदर घटनेची माहीती सिध्दार्थच्या आई वडीलांना झाली. कुञ्यांनी सिध्दार्थच्या मानेसह सहा सात ठिकाणी चावा घेतल्याने सिध्दार्थ चांगलाच रक्तबंबाळ झाला. लागलीच सिध्दार्थला मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले. परंतु सिध्दार्थच्या मानेला झालेली जखम गंभीर आणि खोल असल्याने पुढील उपचारा करीता चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविले. परंतु त्याही ठिकाणी योग्य निदान करता न आल्याने शेवटी नागपूर येथील सुपर स्पेशालिटी मध्ये हलविण्यात आले. कुञ्यांनी चावण्यामूळे सिध्दार्थची मानेची नस फाटली असुन त्यावर लवकरच शस्ञक्रिया करण्यात येणार आहे. जखमी सिध्दार्थ हा जि.प.च्या शाळेत इयत्ता ३ मध्ये शिकत आहे. जखमी सिध्दार्थच्या कुटूंबाची परिस्थिती आर्थिक दृष्ट्या हलाखीची असल्याने शासनाने जखमी सिध्दार्थला मदत करावी.,अशी मागणी सरपंच नितीन गुरनुले यांनी पालकमंञी सुधीर मुनगंटीवार यांचे कडे केली आहे.

दरम्यान गांवातील मोकाट कुञ्यांनी आठ वर्षीय सिध्दार्थला गंभीर जखमी केल्यानंतर ग्राम पंचायत अँक्शन मोडवर आली आहे. गांवातील मोकाट आणि बेवारस कुञ्यांचा शोध घेवुन त्यांना पकडणे अथवा मारून टाकण्याची मोहीम हाती घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here