मूल : महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा ३३ वाढदिवसा निमित्याने मुल ग्रामीण रुग्णालय येथे शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गीऱ्हे युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे यांचे मार्गदर्शनात तथा तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार यांचे प्रमुख उपस्थितीत युवासेना (ठाकरे) गटा तर्फे फळ वाटप करून वाढदिवस साजरा केला. युवासेना शहर प्रमुख अमित आयालानी यांचे नेतृत्वात रीतिक संगमवार युवासेना तालुका प्रमुख यांच्या पुढाकाराने ग्रामीण रुग्णालय मूल येथे रुग्णांना फळवाटप करीत सामाजिक बांधिलकी जोपासली. सदर कार्यक्रमात माजी तालुका प्रमुख सुनील काळे, सागर गावतुरे, वैभव इटकलवार, अरविंद सोनटक्के, निलेश तीवाडे, विजय टिंगुसले, तोहिद शेख, सौरव गिरडकर, सोहेल पठाण, साहिल पेंदोर आदी युवासेना शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.