आदिवासी मूलीवर अत्याचार करणाऱ्यास कठोर शिक्षा करा, आदिवासी समाज संघटनांची मागणी

76

मूल : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यामधील एका अल्पवयीन आदिवासी मुलीवर तेथील दोन नराधमांनी अत्याचार केला. या समाजाला काळीमा फासणाऱ्याना कठोर शिक्षा , फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी अशी मागणी मूल येथील आदिवासी समाज संघटनांनी उपविभागीय अधिकारी मूल यांच्या मार्फतीने मान. राज्यपाल , मान. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

आदिवासींच्या असहायतेचा फायदा घेत असे समाज कंठक अनन्य अत्याचार चालविले आहे. अशा नराधमाना वेळीच शिक्षा झाली नाही तर यांच्यातील वाईट प्रवृत्त्ती बढावेलं आणि समाजात अत्याचार वाढतील. यावर कठोर कारवाही न झाल्यास आदिवासी समाजाच्या वतीने जन आंदोलन उभारू असे या निवेदनात म्हटले आहे. यात अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद अध्यक्ष अशोक येरमे, गोंड सगा मांदीचे संपत कन्नाके, क्रांतिवीर बाबुराव शेडमाके बहु उद्देशिय संस्थेचे लक्ष्मण सोयाम, नाट्य रंगभूमी महाराष्ट्र शासन परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य मुकेश गेडाम, जि. प. माजी सदस्या वर्षा परचाके, मनोहर मडावी, वैशाली सोयाम, माजी सरपंच वनिता सुरमवार, अभिषेक पेंदाम, आणि आदिवासी समाज बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांचे नायब तहसीलदार रामचंद्र नैताम यांच्या मार्फतीने शासनाकडे पाठविण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here