मूल : वन्यप्राण्याच्या हल्लात अनेकांचे बळी जात असुन पाळीव जनावरही मृत्युमुखी पडत आहेत, वन्यप्राण्यांच्या हल्यापासुन जनतेला संरक्षण द्या. अशी मागणी वारंवार होत असताना महाराष्ट्र शासन माञ त्याकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करीत आहे, याच्या निषेधार्थ मूल तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने पार्टीच्या बल्लारपुर विधानसभा क्षेञाचे अध्यक्ष सुमित समर्थ यांचे नेतृत्वात आज स्थानिक तहसिल कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. स्थानिक गांधी चौकातुन निघालेल्या आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, ओबीसी नेते जगदीश जुनघरी, तालुकाध्यक्ष प्रा. किसन वासाडे, शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, महीला आघाडीच्या तालुकाध्यक्षा निता गेडाम, शहर अध्यक्ष अर्चना चावरे, युवक अध्यक्ष समीर अल्लुरवार, मारोती शेंडे आदींसह आबाल स्ञी पुरूष मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. बस स्थानक मार्गाने आक्रोश मोर्चा तहसिल कार्यालसमोर पोहोचल्यावर जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, विधानसभा अध्यक्ष सुमित समर्थ, जगदीश जुनघरी आदींनी मार्गदर्शन करतांना जनतेच्या प्रती विद्यमान महाराष्ट्र शासन उदासिन असुन विद्यमान शासनकर्त्यांना माणसांपेक्षा वन्यप्राणी महत्वाचे झाल्याचा आरोप केला. यावेळी मोर्चेक-यांच्या वतीने तहसिलदार यांचे मार्फतीने शासनकर्त्यांना निवेदन सादर करण्यात आले. तहसिलदार डाँ. रविंद्र होळी यांनी निवेदन स्विकारले. निवेदनात धुमाकुळ घालणाऱ्या वाघांचा बंदोबस्त करावा, बफरक्षेत्राच्या जंगलाला तारेचे कुंपन करावे, वाघाच्या हल्लात ठार झालेल्या व्यक्तीच्या परिवारातील एका व्यक्तीस शासकीय नौकरी द्यावी, वन्यप्राण्यामुळे शेतक-यांच्या शेतमालाचे नुकसान झाल्यास त्यांना तात्काळ मदत देण्यात यावी, गुरे चराईसाठी जंगल आरक्षित करण्यात यावे, स्वरक्षणासाठी शेतक-यांना हत्यार बाळगण्याची परवानगी देण्यात यावी अश्या विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
मोर्चाच्या यशस्वीतेसाठी शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे, सरचिटणीस महेश जेंगठे, महिला तालुकाध्यक्ष निता गेडाम, शहर अध्यक्ष अर्चना चावरे, युवा नेते बंडू साकलवार, प्रा. प्रभाकर धोटे, नंदू बारस्कर अनिकेत मारकवार, शहर उपाध्यक्ष दुष्यांत महाडोळे तालुका सचिव ज्ञानेश्वर वाघमारे, विकास गुरनुले, अजय त्रिपत्तीवार, हेमंत सुपणार, लाला साळवे, शुभम शेंडे, नवनीत चिंचोलकर, मंगल मशाखेत्री , साई पेंदोर, रोहिदास वाढई, सतीश गुरनुले, सुरेश शिंदे, संदीप तेलंग, बालाजी लेनगुरे, राहुल तोटावार, संध्या निकुरे , जयश्री झरकर, विपुल ठिकरे, गिरीधर उईके, किशोर खंडाळे, देवा भुरसे, नंदकिशोर गुरनुले, साई पेंदोर, गणेश गायकवाड, सुरेश गावतुरे, विनायक निकोडे दिनेश कोल्हटवार, दिवाकर चौधरी, लालचंद मेश्राम, आदींनी परिश्रम घेतले, सदर मोर्चात अनुचुचित प्रकार घडु नये यासाठी मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख होता.