ट्र्ँक्टरच्या धडकेत पतीचा मृत्यु, पत्नीसह ट्र्ँक्टर चालक गंभीर जखमी

112

मूल : निर्माल्य वाहण्यासाठी नदीच्या पुलावर उभे असलेल्या पती पत्नीला ट्र्ँक्टरने धडक दिल्याने पतीचा घटनास्थळी मृत्यु तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना नव वर्षाच्या पहील्याच दिवशी सकाळी १०.४५ वा. चे दरम्यान मूल लगत घडल्याने हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

येथील तेली समाजाचे सक्रीय कार्यकर्ते गणपत वासुदेव आगडे (५४) पत्नी सुरेखा गणपत आगडे (४९) हीच्या सह फँशन प्रौ (MH34-AF-6922) ने फिस्कुटी येथे कौटुंबिक कामानिमित्य जात असतांना घरातील पुजेचे निर्माल्य नदी पाञात सोडण्यासाठी मूल-चामोर्शी मार्गावरील उमा नदीच्या पुलावर उभे होते. त्याच दरम्यान मूल वरून चामोर्शीच्या दिशेने जात असलेल्या ट्र्ँक्टर (MH-33-4034) ने धडक दिली. यामध्ये गणपत आगडे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यु झाला तर पत्नी सुरेखा गणपत आगडे हीला गंभीर दुखापत झाली. पती पत्नीला धडक दिल्यानंतर ट्र्ँक्टर नदी पुलावरून नदी पाञात पडल्याने चालक किशोर गुणाजी पोरटे हा ही जखमी झाला. दोन्ही जखमींना उपचारा करीता तातडीने उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. पोलीसांनी ट्र्ँक्टर चालक किशोर पोरटे विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मृतक गणपत आगडे हा येथील कल्याणी ज्वेलर्स मध्ये नोकर होता. त्याचा मनमिळावु आणि हस-या स्वभावामूळे तो अनेकांच्या परीचयाचा होता. त्यामूळे नवीन वर्षाच्या पहील्याच दिवशी त्याचे अपघाती निधन झाल्याने हळहळ व्यक्त केल्या जात आहे. स्व. गणपत आगडे याचे पश्चात पाच भाऊ, पत्नी, दोन मूल आणि एक मुलगी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here