नववर्षा निमित्त पार पडली योग नृत्य स्पर्धा, जय माता दी ग्रृप ठरला प्रथम तर क्रिष्णा कलासागर ग्रृप ठरला दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी

98

मूल : स्थानिक दुर्गा मंदीर सेवा समिती आणि योग नृत्य परीवार मूलच्या वतीने नव वर्षा निमित्य घेण्यात आलेल्या योग नृत्य स्पर्धेत जय माता दी ग्रृपने प्रथम क्रमांक तर क्रिष्णा कला सागर ग्रृप दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. नव वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने सकाळी स्थानिक दुर्गा मंदीराचे प्रांगणात पार पडलेल्या योग नृत्य स्पर्धेचा शुभारंभ रंजना चौधरी यांनी सादर केलेल्या प्रार्थना गीताने झाली. मान्यवरांच्या स्वागता नंतर स्पर्धेला सुरूवात झाली. स्पर्धेत शहरातील एकुण सात ग्रृपने सहभाग घेतला. त्यापैकी जय माता दी ग्रृप प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. क्रिष्णा कला सागर ग्रृपने दुसरा तर महालक्ष्मी ग्रृपने तृतिय क्रमांक पटकाविला. स्पर्धेत लहान मुलांच्या श्री साई ग्रृपला प्रौत्साहनपर बक्षिस देण्यात आले. विजेत्यांना योग नृत्य परीवार मूलचे मार्गदर्शक तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे वतीने योग नृत्य परीवार चंद्रपूरच्या राधीका मुंधडा, किशोरी हिरूळकर, सुरेश खोडके यांचे हस्ते पारीतोषीकाचे वितरण करण्यात आले. ममता सादराणी, मिना निखाडे, मयुरी हेडाऊ, श्रवण मुंधडा आणि रवि निखाडे यांनी स्पर्धेचे परीक्षणाचे काम केले. कार्यक्रमाच्या निमित्याने स्थानिक योग नृत्य शिबीरास नियमित उपस्थित राहुन आरोग्याची काळजी घेणाऱ्या सुमन भोयर, कुसुम कापगते, मिरा शेंडे, रत्नमाला ठाकरे, सुरेश देशमुख, शेषराव ठाकरे, प्रेमीला लाकडे, केदारनाथ कोटगले, विमल भेंडारे, शेषराव ठाकरे, रमेश चिलाके आणि बंडु गुरनुले या ज्येष्ठ मंडळींचा योग नृत्य परीवार मूलच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंदीर समितीचे सचिव संजय पडोळे यांनी केले. आकाश कुकुडकर यांनी संचलन व गुरू गुरनुले यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुनिल मंगर, मुकेश मिश्रा, संदीप मोहबे, विवेक मुत्यलवार, विष्णु सादमवार, दीपक चुगाणी, मुकेश गोवर्धन यांनी परीश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here