टीव्हीच्या वायरिंगने केला घात* *बेंबाळ येथे घराला आग, लाखाचे नुकसान

122

मूल –  मनोरंजनाचे साधन असलेल्या टिव्हीच्या तारेमूळे अचानक आग लागुन घरातील साहीत्य जळुन खाक झाल्याने त्यामुळे लाखोचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील बेंबाळ येथील रोज मजुरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह भागविणारे अमोल मुरलीधर पगडपल्लीवार यांचे कौलारू घर आहे. कुटूंबात वृध्द आई वडील अपंग भाऊ आणि त्याची पत्नी असा परिवार आहे. आज सकाळी १२ वाजताचे दरम्यान जेवन आटोपुन कर्ती मंडळी मजुरी साठी दुसऱ्याच्या शेतावर, वृध्द आई वडील घरासमोर अंगणात बसुन असतांना बंद असलेल्या टिव्हीला जोडलेल्या विद्युत तारेमधुन अचानक धुर निघुन आग लागली. अचानक लागलेल्या आगीने भडका घेतल्याने क्षणार्धात घरात आगीचे डोंब उसळु लागले. पाहता पाहता संपूर्ण घर जळून खाक झाला. घरातील सर्व मंडळी बाहेर असल्याने सुदैवाने कोणतीही जीवहानी हानी झाली नाही परंतु घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य आणि कपडे, खाण्यासाठी खरेदी करून ठेवलेले अन्न धान्य पूर्णतः जळून खाक झाले. यामुळे घराच्या किंमती सह अंदाजे दोन लाख रूपयाचे नुकसान झाले. विद्युत तारेमूळे राहते घर आगीच्या भक्षस्थानी गेल्याने रोजी करून कुटूंब चालवणा-या अमोल पगडपलीवर यांचे संपुर्ण कुटूंब उघड्यावर पडले आहे. लागलेल्या आगीमूळे निराधार झाल्याने वृद्ध आई वडील आणि अपंग असलेल्या भावाला आता निवारा कसा द्यायचा? हा गंभीर प्रश्न अमोल समोर निर्माण झाला आहे. अचानक लागलेल्या आगीने निराधार झालेल्या अमोलच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची गरज आहे. हातावर आणुन पोट चालविणा-या अमोल पगडपल्लीवार यांचे घर जळाल्याने झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून निराधार झालेल्या कुटुंबाला आधार द्यावा व शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी बेंबाळचे सरपंच चांगदेव केमेकार यांनी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here