मूल – डिसेंबर नंतर मालमत्ता आणि पाणी कर भरणाऱ्या शहरवासीयांनी देय कराशिवाय प्रतीमाह दोन टक्के व्याजाची रक्कम भरणा करावी. असे सुचना शहरविसांमध्ये संभ्रम निर्माण झाला असुन याविरूध्द संतप्त प्रतिक्रिया उमटु लागल्या आहेत. दोन टक्के व्याज आकारण्याची नगर प्रशासनाचे कृती चुकीची असुन सदर व्याज आकारणी रद्द न केल्यास तालुका व शहर काँग्रेस पार्टीच्या वतीने जन आंदोलन करण्यात येईल. असा इशारा दिला आहे.
सध्याचा काळ महागाईचा असुन कोरोनाच्या तीन वर्षाच्या कालावधी नंतर आता हळुहळु परिस्थिती बदलत आहे. आर्थिक घडी सुधारत असतांना महागाई वाढु लागल्याने सामान्य नागरीक सध्यास्थितीत कुटूंबाचा उदरनिर्वाह कसाबसा भागवित आहेत, आर्थिक भुर्दंड सहन करत जीवन जगत असतांना नगर प्रशासनाने मालमत्ता व पाणी कराची रक्कम डिसेंबर नंतर भरणा करणाऱ्या नागरीकांनी देय रक्कमेच्या २ टक्के रक्कम अधीक भरावा. असा फतवा काढला आहे. नगर प्रशासनाने काढलेला २ टक्के व्याज वसुलीचा फतवा नागरीकांवर अन्यायकारक आहे. नगर परीषद हद्दीत राहणाऱ्या नागरीकाने न.प. कडुन आकारण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या कराचा भरणा हा आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटच्या दिवसा पर्यंत म्हणजे ३१ मार्च पर्यत करावा. असा नियम असुन नगर परिषदेच्या संबंधित विभागाचे कर्मचारी सुद्धा मालमत्ता आणि पाणी कराची वसुली ३१ मार्च पर्यंत नागरिकांच्या घरोघरी जाऊन करतात. याची नागरिकांना जाणीव आहे. शहरात पाहीजे त्या प्रमाणात रोजगाराची संधी नसल्याने अनेक शहरातील अनेक कुटूंब रोजगारासाठी बाहेर गेले असुन अनेकजन आर्थिक अडचण सोडविण्यासाठी म्हणुन मिरची, चना, कापुस आणि सोयाबिन तोडण्यासाठी जिल्हा आणि राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे रोजीरोटी करून कुटूंब चालविणा-या नागरिकांना नगर परीषदेचा फतवा किंवा आर्थिक वर्षा प्रमाणे कराचा भरणा करणे शक्य होत नाही, तरीसुध्दा आर्थिक व्यवस्थेनुसार बहुतांश नागरीक कराचा भरणा नियमित करीत आहे. नगर परीषदेला आर्थिक अडचण असल्यास उत्पन्नाच्या वेगवेगळ्या मार्गाच्या माध्यमातुन आर्थिक अडचण दुर करावी आणि आर्थिक कारणासाठी राज्य आणि जिल्हा बाहेर गेलेल्या नागरीकांना कराचा भरणा करण्यासाठी जुन्या पद्धतीनुसार ३१ मार्च पर्यंत मुदत द्यावी. अशी मागणी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा जि.प.चे माजी अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे मार्गदर्शनात तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली. मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना मागणीचे निवेदन देतांना २ टक्के व्याज वसुलीची कार्यवाही थांबवुन कर भरण्यासाठी ३१ मार्च पर्यंत नगर प्रशासनाने मुदत द्यावी.अन्यथा जनतेच्या हितासाठी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराही देण्यात आला, यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष गुरुदास गुरनुले, न.प.माजी उपाध्यक्ष राकेश रत्नावार, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती घनश्याम येनुरकर, विविध कार्यकारी संस्थेचे संचालक राजेंद्र कन्नमवार, महिला काँग्रेस अध्यक्ष रुपाली संतोषवार, माजी नगर सेवक विनोद कामडे, लीना फुलझेले, महिला काँग्रेसच्या शामला बेलसरे, सहकारी संस्थेचे संचालक विवेक मुत्यलवार, शहर महासचिव कैलास चलाख, उपाध्यक्ष संदीप मोहबे, अन्वर शेख, गणेश रणदिवे, राकेश मोहुर्ले, मल्लेश आरेवार यांचेसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी आणि नगर परीषद संचालक यांनाही दिले आहे.
व्याज वसुलीची कार्यवाही नगर परीषद अधिनियम १९६५ मधील कलम १५० नुसार करण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेली मागणी जनभावना असल्याने सदर मागणीचे निवेदन शासनाकडे पाठविण्यात येईल. शासनाच्या निर्देशानुसारच कार्यवाही करण्यात येईल
अजय पाटणकर
मुख्याधिकारी. नगर परीषद मूल