विविध स्पर्धा व आकर्षक उपक्रमाने न.प.ने साजरा केला जागतिक महिला दिन             

93

मूल – शहरातील महीलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुल नगर परिषदेने आयोजित केलेल्या विविध स्पर्धा आणि माजी महीला नगराध्यक्ष यांचा सन्मान सोहळा नुकत्याच पार पडला.

स्थानिक कन्नमवार सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमाचा शुभारंभ  नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांचे हस्ते झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, सुनीता चौधरी, रीना थेरकर, उषा शेंडे, प्रकल्प अधिकारी रितेश भोयर, आरोग्य निरीक्षक अभय चेपुरवार, अभियंता श्रीकांत समर्थ, अखील बारापात्रे आदी उपस्थित होते.  नगर परिषद हद्दीतील शासकीय कार्यालयाच्या मोकळ्या भिंती, खुल्या जागेतील संरक्षण भिंती बोलक्या दिसाव्या आणि त्या माध्यमातुन शहर स्वच्छते सोबतच आरोग्याची काळजी हा संदेश घराघरात, माणसा माणसात पोहोचावा या उद्देशाने हौसी चिञकारांसाठी मोठ्या प्रमाणात भिंती रंगविण्याची स्पर्धा आणि ज्येष्ठ महिलांसाठी मँराथॉन स्पर्धा, थाळी फेक, गोळा फेक या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय  क्रमांक पटकावणा-या स्पर्धकांना सन्मानचिन्ह  व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. माजी महिला नगराध्यक्षांचे  स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आले, नगर परिषदेच्या वतीने २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या गणेशोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरणही पार पडले. यावेळी पार पडलेल्या सांस्कृतिक स्पर्धेत शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. नृत्य स्पर्धेत स्मार्ट ग्रृपने प्रथम पारितोषिक पटकाविला द्वितीय पुरस्कार एरोनॉटिल ग्रुप, तृतीय क्रमांक नारीशक्ती ग्रुप, नाटीका स्पर्धेत प्रथम क्रमांक सुशिक्षित बेरोजगार ग्रुप, द्वितीय बक्षिस कामगार ग्रुप तर तृतीय क्रमांक आनंदी गुजन ग्रुपने मिळविला. गीत गायन स्पर्धेत कुमुदिनी भोयर ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली तर द्वितीय वरघंटीवार यांनी मिळविला. सर्व विजेत्या आणि सत्कार मुर्तींचा स्मुर्तीचिन्ह व प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार रागिणी आडेपवार यांनी केले. कार्यक्रमाला शहरातील युवती आणि महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here