मूल – वाढत्या महागाईत कौटुंबिक जबाबदारी सांभाळुन कर्जाची परतफेड करायची कशी ? या विवंचनेत गुरफटलेला तालुक्यातील बोंडाळा बुजरूक येथील शेतकरी जीवनदास पाल याने गळफास लावुन जीवन संपविल्याने परीसरातील समाजमन सुन्न झाली आहे.
मुल पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या बोंडाळा बुजरूक येथील शेतकरी जीवनदास नोमाजी पाल वय (४५) सततच्या नापीकामूळे कर्जबाजारी झाला होता. अल्पश्या उत्पन्नामूळे बँकेकडून घेतलेले कर्ज फेडणे त्याला कठीण होत गेल्याने गणपत याने काही शेत जमीन विकली होती. तरीही त्याच्या वरचा कर्जाचा डोंगर कमी झाला नव्हता. शिल्लक असलेल्या शेतीत उत्पन्न घेवुन कुटूंबाची जबाबदारी पेलुन कसाबसा बँकेचा कर्जाचा हप्ता भरत होता. अलीकडे माञ मार्च महीण्यात कर्जाचा पुर्ण भरणा केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणुन तो मागील काही दिवसांपासुन तणावात होता. याच तणावात गणपतला मार्ग न दिसल्याने त्याने शेवटी जीवन संपविण्याचा मार्ग स्विकारला. आज (१४ मार्च) पहाटे घराच्या मागील शेतात असलेल्या एका आंब्याच्या झाडाला गळफास लावुन आपले जीवन संपविले. त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा वर्ग (९ वी) एक मुलगी वर्ग (७ वी) आई भाऊ असा मोठा परिवार आहे. घटनेची माहीती होताच पोलीस दुरक्षेञ बेंबाळ येथील पोलीसांनी घटनास्थळी भेट देवुन मर्ग दाखल करून शवविच्छेदना करीता उपजिल्हा रूग्णालयात पाठविले. पुढील तपास ठाणेदार सुमित परतेकी यांचे मार्गदर्शनात करीत आहेत.