धनराज खानोरकर यांचा ८२ वा वाढदिवस संपन्न, संतोषसिंह रावत यांनी दिल्या शुभेच्छा

97

मूल : स्थानिक नव भारत विद्यालय येथील सेवानिवृत्त शारिरीक शिक्षण शिक्षक धनराज रामजी खानोरकर यांचा ८२ वा वाढदिवस त्यांचे चिरंजीव तथा युवक काँग्रेसचे सक्रिय पदाधिकारी संजय खानोरकर आणि स्नुषा रजनी संजय खानोरकर व कुटूंबियाच्या पुढाकाराने विविध उपक्रमाने नागपूर येथे साजरा करण्यात आला. नागपूर येथील अयोध्यानगर येथील त्यांच्या राहत्या घरी श्री गजानन महाराज यांची महाआरती आणि कुटूंबातील महीला सदस्यांनी औक्षवंत केले. यावेळी जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत आणि सामाजिक व काँग्रेसचे कार्यकर्ते रशीद शेख यांनी वाढदिवसमुर्ती धनराज खानोरकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देत दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. पिताश्री धनराज खानोरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संजय खानोरकर यांच्या पुढाकाराने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी शेकडो हितचितंकानी धनराज खानोरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here