श्री मॉ दुर्गा मंदीर सेवा समितीच्या वतीने निःशुल्क योग नृत्य शिबिर, स्वस्थ आरोग्यासाठी आयोजन

131

मूल : स्थानिक श्री मॉ दुर्गा मंदीर सेवा समितीच्या वतीने, योग नृत्य परिवार चंद्रपूरच्या सहकार्याने स्थानिक दुर्गा मंदीर येथे दि. १९ नोव्हेंबर २०२२ पासुन सकाळी ५.३० ते ६.३० वाजता पर्यंत निःशुल्क योग नृत्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आयोजीत शिबीराचा नागरिकांनी लाभ घेवुन निरोगी आणि सुदृढ आरोग्य जपावे. असे आवाहन संयोजन समितीने केले आहे. ‘नृत्य हो साथ, तो स्वस्थ रहे आप‘ असा शिबिराचा मुख्य उद्देश आहे. योग नृत्य शिबिराचे मुख्य आयोजक श्री मॉ दुर्गा मंदिर सेवा समितीचे अध्यक्ष संतोषसिंह रावत असून मार्गदर्शक चंद्रपूर येथील योग नृत्य परिवाराचे संस्थापक गोपालजी मुंदडा हे राहणार आहेत. शारीरिक तंदुरूस्ती साठी मानवी जीवनात व्यायाम आणि योगाला फार महत्व आहे. यासाठी प्रत्येकांनी योग आणि व्यायामाला वेळ देणे आवश्यक आहे. योग नृत्य शिबिरात सुक्ष्म व्यायाम,अँक्युप्रेशर,जॉगिंग, हास्यासन,जीम ऑल स्पोर्टस, स्वीमींग, संपूर्ण व्यायाम, अँक्टीव्हिटीज, डॉन्स, गरबा, अँरोबिक्स आणि संगीतमय वातावरणातील योग इत्यादी प्रकारांची माहिती देण्यात येणार आहे. मोटापा, डायबिटीज, बिपी, अस्थमा, दमा, कमर आणि पायाचे दुखणे, मायग्रेन, मानसिक तनाव, थायराईड, कोलेस्टाल, बॅकपेन, पोटाचे विकार, अँसिडिटी आदी रोगांवर योग नृत्य लाभदायक ठरणार असून मानवाची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यात मदत होणार आहे. योग नृत्य प्रशिक्षण काळाथ तज्ञ मंडळी योग नृत्याचे लाभ यावेळी उपस्थितांना सांगणार आहेत. शिबिरामध्ये येताना शिबिरार्थिनी स्पोर्ट जोडे, पांढरा रंगाचे कपडे लावून यायचे आहे. सोबत एक वही, पेन, नॅपकीन, पिण्याच्या पाण्याची बॉटल सोबत ठेवावी लागणार आहे. योग नृत्य शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन योग नृत्य शिबिराचे आयोजक मंदीर समितीचे अध्यक्ष संतोषसिंह रावत आणि संयोजन समितीचे संजय पडोळे, गुरू गुरनूले, रूपलसिंह रावत, सुनिल मंगर, मुकेश महाराज आणि सहकारी सदस्यवृदांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here