विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलविले शोभाताईंनी हास्य, प्रवेशापासुन वंचित विद्यार्थ्यांना आता मिळेल अकरावीत प्रवेश

131

मूल – स्थानिक नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय येथे इयत्ता अकरावी वर्गाच्या प्रवेशासाठी जवळपास ६० विद्यार्थ्यांचा वाढीव प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला होता. मागील तीन चार महिन्या पासून विद्यार्थी आणि त्यांचे पालक अकरावीत प्रवेश मिळावा म्हणुन सातत्याने प्रयत्नशील होते. प्रवेश मिळावा म्हणुन त्यांनी अनेकदा महाविद्यालयाच्या पायऱ्या चढल्या. संस्थेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींना भेटून प्रवेशाकरीता मदतीची याचना केली. परंतु विद्यार्थी आणि पालकांच्या मागणीकडे बहुतांश मंडळींनी दुर्लक्ष केले. त्यामूळे शिक्षणाचा एक वर्ष विनाकारण जाईल. अशी भिती त्यांना वाटु लागली होती. दरम्यान शेवटचा प्रयत्न म्हणुन विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी माजी मंञी तथा स्थानिक स्वामी विवेकानंद विद्या मंदीर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई फडणविस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सहकार्य करण्याची विनंती केली. विद्यार्थी आणि पालकांची कळकळ व प्रश्नाचे गांभीर्य त्यांनी लक्षात घेतले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवु नये म्हणुन तात्काळ राज्याचे शिक्षण मंत्री, शिक्षण सचिव, शिक्षण संचालक, उपसंचालक यांचेशी संपर्क साधुन तसा लेखी पाठपुरावा केला. शेवटी शोभाताईंच्या सततच्या पाठपुराव्याला यश आले. शिक्षण मंत्री आणि शिक्षण सचिव यांनी माजी मंत्री श्रीमती शोभाताई फडणविस यांच्या पाठपुराव्याला दाद देत चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्यातील जे विद्यार्थी इयत्ता अकरावी प्रवेशापासुन वंचित आहेत. त्यांचा इयत्ता अकरावीच्या वाढीव प्रवेश निश्चित करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव समीर सावंत यांनी दिनांक १० नोव्हेंबर २०२२ रोजी आदेश काढला असुन याबाबतचे अधिकार विभागीय उपसंचालक यांना दिले आहे. शासनाच्या या आदेशामूळे चंद्रपुर आणि गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा इयत्ता ११ वी प्रवेशाचा समस्या आता मार्गी लागली आहे. त्यामूळे विद्यार्थी आणि पालकांनी माजी मंत्री श्रीमती शोभाताई फडणविस यांचे आभार मानले असुन शोभाताई फडणविस यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

इयत्ता अकरावीच्या प्रवेशापासुन वंचित असलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्यांना प्रवेश दिला जावा यासाठी जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनीही मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला असुन विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी माजी मंञी श्रीमती शोभाताई फडणवीस यांनाही त्यांनी विनंती केली होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here